पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे वाजले बिगूल… — नोव्हेंबर महिन्यात सर्व राज्यांच्या निवडणुका पार पडणार.. — ३ डिसेंबरला मत मोजणी होणार…

प्रदीप रामटेके 

मुख्य संपादक 

         भारत देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांची आज घोषणा केल्यानंतर विविध राजकीय पक्षातंर्गत हालचालींना वेग आला असून सदर पाच राज्यात आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. 

                 मध्यप्रदेश,राजस्थान,छतीसगढ़,तेलंगणा,मिझोरम,या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांची जाहीर झाल्याने त्या देश पातळीवरल राष्ट्रीय पक्षातील व राज्यातील राज्यस्तरीय पक्षातील नेत्यांच्या,पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या हालचालींना वेग आला आहे.

      — मध्यप्रदेश राज्यामध्ये २३० विधानसभा मतदार संघ असून १७ नोव्हेंबरला एकाच दिवशी तेथील सर्व विधानसभा मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

       — राजस्थान मध्ये २०० विधानसभा मतदार संघ असून २३ नोव्हेंबरला एकाच दिवशी तेथील सर्व विधानसभा मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहे..

   — तेलंगणा राज्यात ११९ विधानसभा मतदार संघ असून ३० नोव्हेंबरला एकाच दिवशी तेथील सर्व मतदार संघात मत प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

    — छतिसगड राज्यात ९० विधानसभा मतदार संघ असून छतिसगड राज्याचा काही भाग नक्सल प्रभावीत असल्याने तिथे ७ व १७ नोव्हेंबरला दोन भागात मतदान प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहे.

 — मिझोरम राज्यात विधानसभाचे ४० मतदार संघ असून तेथील सर्व मतदार संघात ७ नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

           सर्व राज्यांची मतदान प्रक्रिया नोव्हेंबर महिण्यात पूर्ण झाल्यावर ३ डिसेंबर २०२३ ला सर्व राज्यांची मतगणनना केली जाणार आहे.