सावली ( सुधाकर दुधे )
केंद्रात भाजपाचे..सरकार ,त्यानंतर.नुकताच राज्यात सत्तांतर.होऊन शिंदे फडणवीस यांचे सरकार आले,यामुळे केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार असल्याने जनकल्याणाच्या हितासाठी केंद्र आणि राज्य असे आमचे दोन्ही सरकार सज्ज राहतील असे प्रतिपादन चिमुर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केले…ते व्याहाड खुर्द येथे भाजपाच्या वतीने आयोजित शेतकरी ,शेतमजूर ,कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन म्हणून बोलत होते.
यावेळी मंचावर. जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनंगटीवार,खासदार अशोक नेते,माजी आम.अतुल देशकर,जिल्हाध्यक्ष देवराव भोंगडे,भाजपा तालुकाध्यक्ष तथा ओबीसी जिल्हाध्यक्ष अविनाश.पाल.,माजी बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, माजी सभापती छाया शेंडे, माजी जि.प.सदस्य योगिता डबले,आदी उपस्थित होते .
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांच्या संदर्भात महत्वपूर्ण योजनाचा आणि विकासात्मक कामाचा कधी विचार केला नाही ,त्यामुळे हे सरकार अस्थिर होऊन.महाविकास आघाडीच्या नेत्याकडुनच सरकार पराभूत करण्याचा प्रयत्न. केला गेला, आणि हा प्रयत्न यशस्वी होऊन राज्यात शिंदे आणि फडणवीस च्या माध्यामातुन. नवे शिंदे फडणवीस सरकार अस्तीत्वात आले,नवे सरकार येताच शेतकऱ्यांच्या आणि सामान्य लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले, त्यामुळे केंद्रात आणि राज्यात आमचेच सरकार असल्याने आणि मी या क्षेत्राचा खासदार या नात्याने.तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे सरकार नेहमी तत्पर राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली,भारतीय जनता पार्टी हा केवळ पक्ष नसून परिवार आहे,मागील काळात या भागातील मतदारांनी फार.मोठी चुक केली, मात्र यावेळी मतदाराकडुन अशी चुक होता कामा नये,त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी कार्य करुन पक्षाला मजबूत करावे ,असे मत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमा दरम्यान भाजप तालुका अध्यक्ष अविनाश पाल यांनी तालुक्यातील अनेक समस्या मंत्री महोदयासमोर.व्यक्त केल्या.यावेळी अनेक कांग्रेस कार्यकर्तेंचा भाजपात प्रवेश करण्यात आला, तसेच सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला.
.कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला मार्लापण करून करण्यात आली,कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल,संचालन क्रिष्णा राऊत, तर आभार गुड्डी चिमुरकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुळशीदास भुरसे,नितीन पाल, अरुण पाल.राकेश गोलेपल्लीवार डा पवन कवठे,नितीन कारडे, जितेंद्र सोनटक्के,
किशोर.वाकुडकर, विनोद.भुरसे,प्रविण देशमुख, मुकेश भुरसे, मुकेश मजोके ,शरद मडावी , विजय बोरकुटे प्रशांत तांगडे,आकाश बोबाटे, सुनील मुनघाटे आदीनी परिश्रम घेतले,यावेळी बहुसंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते…