जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :-
रेकीचे संदर्भ दोन आहेत.एक प्रकार हत्या व किडण्यापिंग करण्यासंबंधाने आहे तर दुसरा प्रकार मानव उपचार करण्यासंबधाने आहे.
या बातमीमध्ये रेकीचा संबंध हत्या व किडण्यापिंग करण्यासंबंधाने संबंधाने संसयीत आहे.
दखल न्यूज भारतचे मुख्य संपादक प्रदीप रामटेके हृदयविकाराच्या आजारातून थोडे बरे होत पत्रकारिताकडे वळले व त्यांनी हायवे रस्त्याच्या बोगस कामांबाबत आणि इतर बोगस कामान्वये महत्त्वपूर्ण संपादकीय अग्रलेख आणि बातम्या प्रकाशित केल्यात.
बोगस कामाची झड संबंधित ठेकेदारांना पुढे चालून सोसावी लागणार असल्याची चिन्हे असल्याने संबंधित ठेकेदारांच्या माध्यमातून प्रदीप रामटेके यांची दोनदा रेकी करण्यात आली असल्याची माहिती आहे व रेकी करण्याला एका राष्ट्रीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सहकार्य केले आहे.तद्वतच बोगस कामे करणाऱ्या ठेकेदारांचे हितचिंतक असलेले सदर राष्ट्रीय पक्षाचे कार्यकर्ते नेहमी त्यांच्यावर पाळत ठेवून असल्याचे दिसून येत आहे.
दखल न्यूज भारतचे मुख्य संपादक यांनी सदर घटना आपल्या खाजगी डायरी मध्ये नोंद केली असून रेकी करण्यास सहकार्य करणेवाल्या एका राष्ट्रीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे व पाळत ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांची नावे डायरीत नमूद करून ठेवली आहेत.
याचबरोबर असुरक्षित झाल्यास ते गोपनीय विभागाला घटनाक्रम कळवू शकतात..