…दखल न्यूज विशेष…
मागील २५ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व प्रकारची वृक्षतोड झपाट्याने सुरू आहे,आजच्या स्थितीत सुध्दा सुरु आहे.मात्र वृक्षतोड बदल्यात वृक्ष लागवड अजिबात केली गेली नाही.या वास्तव्याला जबाबदार कोण?हा प्रश्न गृहीत धरून वनविभागाच्या व महशुल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्येक वृक्षतोड मंजूर प्रकरणातंर्गत सखोल असी गोपनीय चौकशी करावी असे चिमूर तालुक्यातील नागरिकांचे म्हणणे आहे.
जेवढी झाडे तोडली गेली आहेत तेवढीच झाडे लावणे व जगविणे अनिवार्य होते.आणि झाडे लावणे व जगविणे या अनुषंगाने वनविभागाच्या व महशुल विभागाच्या संबंधितांनी शासन धोरणानुसार कर्तव्य पार पाडणे गरजेचे होते.मात्र दोन्ही विभागाच्या संबंधितांनी वृक्षतोड करणाऱ्यास अभय देत त्यांच्या कडून वृक्षलागवड केली नाही व त्यांच्या कडून वृक्ष जागवून घेतली नाही.यामुळे चिमूर तालुक्यातील वनसंपदा झपाट्याने कमी झाली.
आजही चिमूर तालुक्यात सागवान व इतर किसमचे वृक्ष झपाट्याने तोडली जात आहेत.नदी थडव्यावरील झाडे तोडायला बंदी असताना सुद्धा तेथील सुध्दा झाडे तोडण्यात येत आहेत.तद्वच वृक्षतोड अंतर्गत परवानगी किती झाडांची आहे व किती झाडे तोडण्यात येत आहेत याचा पायपोस कुणालाच राहातं नसल्याचे चित्र आहे.
नेरी,शंकरपूर,भिसी,व इतर वन परिक्षेत्रातील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर मागील वर्षी मोठमोठ्या झाडांची वृक्षतोड झाली आहे व सध्या सुरू असल्याचे पुढे आले आहे.