निरा व भीमा नद्यांचे बंधारे तुडुंब भरल्याने पिकांना जीवदान… — नदीकाठच्या नरसिंहपूर ते सराटी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

        परतीचा पाऊस तसेच उजनी धरणातून भीमा नदीत नुकतेच पाणी सोडल्याने नीरा व भीमा नदीवरील बंधारे पाण्याने तुडुंब भरले आहेत. त्यामुळे नरसिंहपूर तसेच सराटी (ता. इंदापूर) परिसरातील पिकांना जीवदान मिळणार आहे. जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याची सध्या चिंता मिटल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

          परतीचा पाऊस तसेच उजनी धरणातून भीमा नदीत नुकतेच पाणी सोडल्याने नीरा व भीमा नदीवरील बंधारे पाण्याने तुडुंब भरले आहेत. त्यामुळे नरसिंहपूर तसेच सराटी (ता. इंदापूर) परिसरातील पिकांना जीवदान मिळणार आहे. जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याची सध्या चिंता मिटल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

           भाटनिमगाव बंधाऱ्यात उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यातून पाणी अडवून बंधारे तुडूंब भरून घेतले आहेत. त्यामुळे नदीवरील इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक, गणेशवाडी, बावडा, भांडगाव, भाटनिमगाव, बाभूळगाव तर माढा तालुक्यातील शेवरे, चांदज, टाकळी, गारअकोले, रुई, आलेगाव व रांजणी गावातील शेकडो एकर शेतातील पिकांना उन्हाळ्याच्या तोंडावर पाणी उपलब्ध झाले आहे.

         नीरा नदीवरील संगम, ओझरे, लुमेवाडी, अकलाई, सराटी आदीसह बंधारे पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाणी अडवून भरून घेण्यात आले आहेत. त्यामुळे नदी काठावरील पाणी पिण्याच्या योजनांना पाणी कमी पडणार नाही.

         भीमा नदी तुडुंब भरली असली तरी विजेच्या  लपनडावा अभावी पाणीच देता येत नाही. त्यामुळे विद्युत मोटारी बंद राहत असल्याने केबल, स्टार्टर व मोटारी चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे. याबाबत पोलिस व महसूल विभागाने योग्य निर्णय घ्यावा.

 ग्रामस्थांची मागणी 

 नीरा नदीकाठावरील इंदापूर तालुक्यातील सराटी, लुमेवाडी, गोंदी, गिरवी, नरसिंहपूर, निरनिमगाव, चाकाटी तसेच माळशिरस तालुक्यातील संगम, गणेशगाव, बिजवडी, सवतगाव, तांबवे, माळीनगर, अकलूज आदि गावातील हजारो एकर जमीन क्षेत्राला फायदा होणार.

        भीमा नदीच्या पाण्यामुळे विहिरी, बोअर, तलावांच्या पाणी पातळीत होणार वाढ.

      नरसिंहपूर, टणू व भाटनिमगाव बंधारा ऐन उन्हाळ्याच्या तोडावर पाण्याने भरले. 

      शेकडो एकर मधील पिकांना काही दिवसांसाठी जीवदान. 

       नीरा, भीमा नद्यांच्या परिसराला पाण्यामुळे बागायतीचे स्वरूप प्राप्त झाले.

        विजेच्या लपंनडावामुळे पिके जळण्याची भीती वाटत आहे.

        भीमा नदीवरील नरसिंहपुर, टणू भाटनिमगाव या तीन बंधाऱ्यात उजनी..

           धरणातून सोडलेले प्राणी अडवल्याने बंधारे तुडुब भरले असताना मात्र विजेच्या लपंडावामुळे पिके जळून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर शेतातील विह्मिरी भरल्याने विजेच्या लपंडावात मोटार चालवून शेतीला पाणी दिले जात आहे.

          इंदापूर तालुक्यातील नरसिंहपुर, टणू पिंपरी बुद्रुक, गणेशवाडी, बावडा, भांडगाव, भाटनिमगाव, बाभूळगाव तर माढा तालुक्यातील शेवरे, चांदज, टाकळी, गार अकोले आदी गावांना अधिक फायदा होणार आहे.