ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेच्या हल्ल्याचा दर्यापूरात निषेध, हिंसक हल्ले करणाऱ्याना जशास तसे उत्तर देऊ, वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषदेत माहिती… 

युवराज डोंगरे /खल्लार 

           उपसंपादक

         ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या लक्ष्मण हाके यांची गाडी फोडण्यात आल्याची घटना घडली आहे. लक्ष्मण हाके यांच्या कारच्या मागच्या बाजूच्या काचा फोडण्यात आल्याचा दिसून आलं आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बाचोटी हा प्रकार घडल्याची माहिती आहे.

          बाचोटी येथून जात असताना काही जणांनी काही जणांनी तोंड बांधून हल्ला केला असल्याची लक्ष्मण हाके यांनी माहिती दिली. ओबीसींनी त्यांच्या हक्काचं रक्षण करायचं नाही का? असा सव्वा लक्ष्मण नेते यांनी उपस्थित केला आहे.

          त्या हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी दर्यापूर यांच्यावतीने लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दर्यापूर येथे पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय चौरपगार मराठा खानावळ असा उल्लेख बोलताना व्यक्त केला आहे. 

          नांदेड जिल्ह्यात प्रचारासाठी दौऱ्यावर असताना ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर भ्याड हल्ला करण्यात आला. आम्ही या हल्ल्याचा तीव्र निषेध करीत आहोत.

          विधानसभा निवडणुकीत मराठा खाणावळीच्या एकजातीय घराणेशाहीला आव्हान देणाऱ्यांना जर अशाप्रकारे हिंसक हल्ले करून रोखण्याचा प्रयत्न होणार असेल तर वंचित बहुजन आघाडी हे कदापि सहन करणार नाही.

           सर्वसामान्य ओबीसी बांधवांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी आणि एससी, एसटी, ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटीबद्ध आहे.

          प्रस्थापित मराठा नेतृत्वाच्या घराणेशाहीच्या सत्तेला आव्हान निर्माण झाल्यामुळे ते बिथरले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती या मराठा खानावळ आहेत. या मराठा खानावळीनेच आपल्या हस्तकांच्या माध्यमातून लक्ष्मण हाकेवर हल्ला केला आहे. असे हल्ले घडवून राज्यात दहशतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे.

         वंचित बहुजन आघाडी ही दहशत बिलकुल खपवून घेणार नाही. असे जिल्हाध्यक्ष संजय चौरपगार यांनी दर्यापूर येथे पत्रकार परिषद घेऊन केले आहे.

         वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आज जाहीर करीत आहोत की पुन्हा जर असे भ्याड हल्ले करण्यात आले तर जशास तसं उत्तर देण्यात येईल.

         हल्ला करणाऱ्यांच्या नेत्यांना आम्ही जिल्ह्यात फिरू देणार नाही पत्रकार परिषदेला मार्गदर्शन करताना वंचित बहुजन आघाडीचे दर्यापूर येथील ओबीसी पदाधिकारी उपस्थिती होती.

        वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष संजय चौरपगार जिल्हा अशोक नवलकर जिल्हा महासचिव प्रवीण लाजूरकर जिल्हा सचिव अशोक दुधांडे जिल्हा सचिव सुरेंद्र तायडे वंचित बहुजन आघाडी दर्यापूर तालुका अध्यक्ष मनोज जामनिक माजी सरपंच प्रकाश निवाने अजाबराव वालसिंगे प्रमोद राऊत रामदास भराटे राहुल नितोने अशोक शित्रे पत्रकार परिषदेला ओबीसी बांधव खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.