जेंव्हा कोणत्याही निवडणुकीच्या काळात म्हणजेच आचारसंहितेच्या काळात संबंधित राज्याची प्रशासकीय व्यवस्था,तेंव्हा तुमच्याच हाती कार्यान्वित असते…
मुख्यनिवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालन करणे हे संविधानात्मक कर्तव्य बजावणे हे तुमचे आद्यकर्तव्य आहे.
परंतू या मुख्यनिवडणूक आयोगाच्या आदेशाचे किंवा सत्ताधारी राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे,किंवा संविधानिक संस्थांच्या जबाबदार पदाधिकारी यांच्या संविधानविरोधी आदेशाचे,अनैतिक आदेशाचे पालन करणे अथवा न करणे. हे शेवटी तुमच्या जागृत असलेल्या त्या हृदयातील सदसदविवेक बुद्धीवर अवलंबून आहे…..
मग तो आदेश मतमोजणी वेळी क्षुल्लक ( अगदी नगण्य परंतू परिणामकारक ) मतांचा फरक करुन वरील आदेशानुसार कुणाला जिंकून द्यायचा असेल,अथवा कुणाच्या आचारसंहिता भंगचे गुन्हे दाखल करायचे अथवा कुणाकडे दुर्लक्ष करायचे, हा अधिकार स्थानिक पातळीवर तुमचा आहे.
अशा वेळी,तेंव्हा एकीकडे हे असंविधानिक व अनैतिक वरिष्ठांचा आदेश,सोबतच लालूच किंवा धमकी , तर दुसरीकडे 140 कोटी जनतेचे……..
लोकशाहीचे…..
संविधानाचे…….
देशाचे भवितव्य……
तुमच्या हातात……..
अशा द्विधा मानसिकतेच्या कात्रीत जेंव्हा तुम्ही अडकीत्यातील सुपारीप्रमाणे अडकता,तेंव्हा मात्र हैद्राबाद येथील प्रशिक्षण शिबिरातील घेतलेली…….
संविधाननिष्ठतेची शपथ
आठवण हृदयात सतत जवळ ठेवायची….
देशाच्या स्वातंत्र्यविरांनी, संविधानाच्या शिल्पकाराने, देशाच्या जडण घडणीसाठी प्रसंगी प्राणाची आहुती दिलेल्या महापुरुषांनी,जागतिक तत्ववेत्त्यांनी,जगाच्या व देशाच्या कल्याणासाठी,स्वातंत्र्य,समता,न्याय आणि बंधुता या लोकशाही मूल्यांच्या अविष्कारितेसाठी जीवनभर झोकून दिले.त्यांच्या अस्मितेच्या रक्षणाची आणि निरागस 140 कोटी जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या आचार संहितेच्या काळात तुमच्यावर येते.
अशा काळात तुम्ही तुमच्या हृदयातील विवेक शक्तीशी बेइमान होऊन वरिष्ठाच्या असंविधानिक आदेशाप्रमाणे निर्णय दिलात, तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावेच लागतील.निवृत्त झाल्यानंतर जेव्हा शेवटची घटका जवळ येईल तेंव्हा तुमचे मनच तुम्हाला खाऊन टाकून पश्चातापाची वेळ येईल.परंतू ,त्या वेळी कुकर्माची फळे भोगन्याशिवाय पर्याय राहणार नाही.
तेंव्हा स्वाभिमानाने जीवन एखाद्या……
जबाबदार संविधाननिष्ठ जिल्हाधिकारी प्रमाणे जीवन व्यतीत करायचे असेल,तर जीवनभराच्या कोणत्याही काळात ( आचारसंहितेच्या काळातच नव्हे तर प्रत्येक वेळी ) वरिष्ठाच्या, राजकीय नेत्यांच्या असंविधानिक आदेशाचे पालन न करता त्यांना लोकशाही व संविधानाची शक्ती दाखवून द्यावी……
अन्यथा जीवनभर कुकर्म फळे भोगण्यासाठी तयार रहा…..
मग ते माझ्या सारख्या असंख्य संविधानवादी, लोकशाहीवादी,मानवतावादी,सर्वसामान्य जागृत जनतेच्या रोषाला सामोरे जाण्यासाठी तयार रहा!
जागृतीचा लेखक
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689