आळंदीत “वसु – बारस” निमित्ताने गो मातेचे व वासराचे पूजन… — भाजपच्या वतीने शहरात विविध ठिकाणी गो माता पुजन सोहळा… 

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : दिवाळी सुरु होते ती “वसु – बारस” या दिवसापासून. गाई-वासरंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो. हिंदू धर्मात गाईला महत्वाचे स्थान आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गाई व वसरासासह पूजा केली जाते. त्याच अनुषंगाने आळंदी शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आळंदी परीसरात “वसु – बारस” निमित्ताने गो मातेचे व वासराचे पूजन करण्यात आले.

          यावेळी भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी शहरातील चावडी चौक, महाद्वार चौक, चाकण चौक, नगरपरिषद चौक, वडगाव रोड चाळीस फुटी, दत्त नगर, येडेश्वरी मंदिर, काळेवाडी, इंद्रायणी नगर, विश्रांतवड याठिकाणी नागरिकांसाठी गो मातेची व्यवस्था करण्यात आली आहे. वसुबारसच्या दिवशी वासरासह असलेल्या गाईचं पूजन करण्यात आले. गाईच्या पायावर पाणी घालणे. तिला ओवाळणे. तिला गंध लावणे, नैवेद्य दाखवणे, चारा खायला घालणे आणि तिचा सांभाळ करणारा जो गोपालक आहे त्याला धान्य देण्यात आले. यावेळी भाजपच्या वतीने विविध ठिकाणी गो मातेची व्यवस्था करण्यात आल्याने गो मातेची सेवा व पुजा करण्याचे भाग्य मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

            यावेळी भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे, हभप संजय महाराज घुंडरे, सागर बोरुंदीया, पांडुरंग वहीले, सचिन गिलबिले, सागर भोसले, दिनेश घुले, संतोष गावडे, भागवत आवटे, बंडूनाना काळे, वासुदेव तुर्की, चारुदत्त प्रसादे, संकेत वाघमारे, ज्ञानेश्वर बनसोडे, भागवत काटकर, संगिता फपाळ, सागर महाराज लाहूडकर, आनंद वडगावकर, विकास पाचुंदे, शिवानंदन पाटील, प्रथमेश होले उपस्थित होते.