अमान क़ुरैशी
जिल्हा प्रतिनिधि
सिंदेवाही :- पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या गडबोरी येथे साप चावून एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
सौ.प्रतिभा विलास वढे वय ३६ वर्ष असे मृत महिलेचे नाव आहे.मयत प्रतिभा ही नेहमी प्रमाणे बुधवारी सकाळी ६ वाजता झोपून उठली व बाहेर निघत असताना दरवाजाच्या पडद्याआड काहीतरी चावले असल्याचे तिला जाणवले.
मात्र बाजूने उंदीर गेला असल्याने उंदीर चावला असेल,असली तिची कल्पना झाली आणि यानंतर मृतक प्रतिभा ही घरघुती काम करण्यास व्यस्त झाली.
काही वेळानंतर तिला बरे वाटत नसल्याने गावातील डॉक्टर कडे नेले.उपचारानंतर परत तब्येत जास्त खालावली असल्याचे पाहून तेथील स्थानिक डॉक्टरांनी सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले.
परंतु सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात जाईपर्यंत प्रतिभा हीची तब्येत जास्तच खालावली. डॉक्टरांनी कोणतातरी विषारी साफ चावला असल्याचे सांगितले व त्यांनी तात्काळ चंद्रपूर येथे पाठविले.
त्यामुळे प्रतिभाला चंद्रपूर येथे नेत असताना चंद्रपूर जवळ तिचा मृत्यू झाला.सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे शवविच्छेदन करून प्रेत गडबोरी येथे आणून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.तिच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि सासू आहे.
प्रतिभा ही शांत,सुस्वभावी आणि मनमिळाऊ असल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.