प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
सध्यास्थित चिमूर विधानसभा मतदारसंघासह महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.त्यांच्या गंभीर समस्यांची सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्र शासन अपयशी ठरले आहे.यामुळे शेतकरी नैराश्यवादी जिवन जगताना दिसत आहेत.जनुकाही त्यांच्या मस्तकावर महाराष्ट्र शासनाने नैराश्य मारले की काय?अशा प्रकारची चिंताजनक परिस्थिती त्यांची झाली आहे.
शेतकऱ्यांच्या विविध प्रकारच्या समस्यांची हाक महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचावी यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाद्वारा उद्या भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या भव्य मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेता ना.विजयभाऊ वडेट्टीवार,महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे आमदार अभिजित वंजारी,माजी आमदार तथा माजी खनिकर्म विकास महामंडळ अध्यक्ष,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य महासरचिटणीस डॉ.अविनाशभाऊ वारजूकर,चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ओबीसी सेलचे महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ.सतिष वारजूकर व इतर पक्ष श्रेष्ठी आणि पदाधिकारी करणार आहेत.
***
संबोधित करणार..
शेतकऱ्यांच्या भव्य मोर्चाला संबोधित करताना ना.विजयभाऊ वडेट्टीवार,डॉ.अविनाशभाऊ वारजूकर,डॉ.सतिष वारजूकर,राष्ट्रीय काँग्रेस पक्षातंर्गत ओबीसी सेलचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री.धनराजभाऊ मुंगले,राष्ट्रीय काँग्रेस चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके,महाराष्ट्र राज्य सेवादल सहसचिव प्रा.राम राऊत,चिमूर तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य विलासभाऊ डांगे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी चिमूर तालुकाध्यक्ष संजय घुटके,मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी जिल्हाध्यक्ष संजय डोंगरे,चिमूर तालुका सेवादल अध्यक्ष किशोर शिंगरे,काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माधव बिरजे यांचा जोरदारपणे आवाज कडाडणार आहे.
***
निवेदन देणार व पाठविणार..
या मोर्चाच्या वतीने चिमूरचे उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संबंधाने निवेदन देण्यात येणार आहे व त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे,महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्यासह इतर मंत्री,अधिकारी यांना निवेदनाच्या प्रती उचित कारवाईसाठी पाठविण्यात येणार आहेत.
***
शेतकऱ्यांच्या संबंधाने महत्वपूर्ण अशा विविध मागण्या खालीलप्रमाणे..
१)शेतक-यांना सोयाबीनची सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी.
२) गोसीखुर्वचे पाणी शेतक-यांना मिळाले नाही. व नविन वराने शेतक-यांच्या जमिनीचा मोबदला वयावा.
३) रस्त्यांच्या कामात सुरू असलेला भ्रष्टाचार बंद करा.
४) शेतकऱ्यांना टोल फ्री नंबर वर पिक विमा कंपनी कडून प्रतिसाद मिळत नाही व प्रचंड भ्रष्टाचार करून पिक विमा कंपन्या मालामाल झालेल्या आहे.
५) शेतकऱ्यांनी कापूस धान ई. पिकाचा विमा उतरविला परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी पाऊस उशीरा सुरु झाल्यामूळे कापसाचा विमा काढला परंतु सोयबीनचा पेरा केला,सोयाबीनचा विमा काढला व कापूस पेरला.खते,बी,बियाने किटकनाशके ई. महागडया औषधी वापरुनही बुरशीजन्य रोगाने सोयाबीन पिकले नाही.
६) पशुवैद्यकीय दवाखाण्यामध्ये जनावरासाठी औषधी उपलब्ध नाही,पशु आरोग्य व्यवस्था पुर्णपणे कोलमडली आहे,दुग्ध व्यवसाय या तालुक्यामध्ये जवळपास नाहीच,उत्पादन वाढीसाठी शासकीय अधिकाऱ्याकडून कोणतेही प्रयत्न होत नाही.
७) जनावर वाटप योजनामध्ये प्रचंड भ्रष्ट्राचार झाला आहे याबाबत चौकशी समिती नेमावी.
८) ई- पिक पध्वतीमध्ये अनेक दोष असुन व्यवस्था बरोबर होत पर्यंत तलाठी यांचे माध्यमातुनच जुण्या पद्धतीने केलेली नोंद ग्राहय धरण्यात यावी.
९) शेतकऱ्यांचे उर्वरीत कर्ज माफ करण्यात यावे, सक्तीची कर्ज वसुली करण्यात येवू नये.
१०) जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी २५ : मवत शेतकऱ्यांना करु असे सांगीतले परंतु शासनाने पिक विमा कंपनीकडे पुर्ण रककम न भरल्यामूळे पिक विमा कंपनी टाळाटाळ करीत आहे.प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगामातील प्रतिकुल परिस्थिती मूळे झालेले नुकसान भरपाई निश्चित करण्याबाबत प्रसिध्द केलेल्या अधिसुचनेतील अटी शिथील करणे.
११) घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास रेती देण्यात यावी,रेती घाटावर कॅमेरे बसविणे व ऑनलाईन पध्वतीने रेती विक्री करणे याबाबत कार्यवाही करावी.
१२) संजय गांधी निराधार योजनेचा मानधन वेळेवर देण्यात यावे.
१३) महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता जळगावकर यांनी प्रचंड भ्रष्टाचार केलेला असुन शेतक-यांशी उर्मट व असभ्य व्यवहार करतात, जळगावकर यांची भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी.अनेक ट्रांसफ्रामर जळलेले असल्यामुळे योग्य वेळेत दुरुस्ती न केल्यामुळे शेतक-यांचे पिकांचे नुकसान झाले त्याची नुकसान भरपाई विज वितरण कंपनीने बयावी, व्यावसायिक विज ग्राहकांना कनेक्शन देतांना नियमाची पायमल्ली केलेली आहे.कृषी विज पंप कनेक्शन अजुनही शेतक-यांना देण्यात आलेली नाही तरी तातडीने कृषी विज पंप कनेक्शन देण्यात यावे, घरघुती विज ग्राहकांची विज कापण्यांत येवु नये.
१४ ) शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांमूळे दिवसा शेतीपंपाला विज पुरवठा करण्याचे आदेश द्यावे.
१५) घरघूती विज दरांमध्ये केलीली भरमसाट वाढ कमी करण्यात यावी.
१६) रानटी डुकरे व ईतर वन्य प्राण्यांमुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान होत आहे.शेतकऱ्यांना वनविभागाकडुन पुरेशी आर्थिक मदत दिल्या जात नाही,त्यामुळे वनविभाग व शासनाबददल शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.म्हणुन चिमुर येथील विज वितरण कार्यालय व वनविभाग कार्यालयास शेतकरी धडक मोर्चाचे माध्यामातुन घेराव करण्यात येणार आहे.
१७) स्वस्त धान्य दुकानामधुन ग्राहकांना अर्धे अन्य धान्य देण्यात आले ते पुर्ण देण्यात यावे.
१८) ज्या शेतक-यांचे डिमांड पेंडींग आहे.त्यांना त्वरित कनेक्शन मंजुर करण्यात यावे.
१९) शेतकऱ्यांना सोलर झटका मशीन सबसिडीवर पुरविण्यात यावी घरकुल लाभार्थ्यांना शासनाने रेती मोफत वेण्यात यावी.
२०) विद्युत कनेक्शन धारकाच्या परवानगी शिवाय शेतक-यांचे विद्युत कनेक्शन कापु नये.
२१) शासकिय धान खरेदी त्वरीत सुरू करण्यात यावी व प्रतीक्विंटल १००० रु बोनस देण्यात यावा.
२२) रोडवर लावलेल्या व झुकलेल्या विजेच्या तारा व खंबे यांचे मेंटनस करण्यात यावे. रानडुकराचा जंगली प्राण्याचा वर्जा कमी करण्यात यावा.
२३) शेतक-यांच्या नादुरूस्त सौर ऊर्जा पंपाची जवाबदारी स्विकारण्या या कंपनीला विचारणा करून त्वरित दुरुस्तीची कार्यवाही करावी किंवा त्याला सरसकट विजेचे कनेक्शन द्यावे. ग्रा.पं. चे वाढीव पोल मंजुर करून घरगुती मोटर वेण्याची व्यवस्था करावी.
***
मोर्चात सहभागी होण्यासाठी व यशस्वी करण्यासाठी शेतकरी बांधवांना आव्हान..
शेतकऱ्यांच्या हितसंबंधाने विविध प्रकारच्या २३ मागण्या राष्ट्रीय काँग्रेस पक्ष चिमूर विधानसभा मतदारसंघ,चिमूर तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,चिमूर तालुका महिला काँग्रेस पक्ष व चिमूर तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्ष किसान मोर्चा नेतृत्वाने रेटून धरल्या आहेत.त्या मागण्या मान्य करण्यासाठी चिमूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी उद्याच्या शेतकरी मोर्चात हजारोंच्या संख्येने हिरहिरीने सहभागी होण्याबाबतचे आवाहन चिमूर तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष डॉ.विजय गावंडे, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष किसान सेलचे तालुका अध्यक्ष राजू उर्फ हेमंत कापसे,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे चिमूर शहर अध्यक्ष अविनाश अगडे यांनी केले आहे.