दिक्षा कऱ्हाडे

  वृत्त संपादिका

 

        अतिवृष्टीमुळे शेतमालाचे झालेले नुकसान व नुकसानी अंतर्गत महाराष्ट्र शासनाद्वारा शेतकऱ्यांना मिळणारा आर्थिक मोबदला भेदभाव अन्वये कुणाला रडवणारा तर कुणाला समाधान देणारा ठरलेला आहे.तद्वतच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर शेतमाल नुकसान भरपाईचे रुपये पडण्यास होणारी दिरंगाई शेतकऱ्यांना दिलासा देण्यास कुचकामी ठरत असल्याने,शेतमाल नुकसान भरपाईचे रुपये केव्हा मिळणार?हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

         अतिवृष्टी अंतर्गत शेतमाल नुकसान भरपाईचे रुपये काही शेतकऱ्यांना (मोजक्या) दिवाळी पुर्व मिळाले,आताही मिळत आहेत.मात्र ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे रुपये अजून पर्यंत मिळाले नाही ते शेतकरी शासनाच्या संबंधित मंत्रालयाकडे व मंत्र्यांकडे टक लावून आहेत.

           बॅक खात्याद्वारा शेतकऱ्यांना शेतमाल नुकसान भरपाईचे रुपये देण्यास होणारा कमालीचा विलंब म्हणजेच शेतकऱ्यांच्या बाबतीत संथ गतीने काम करणारी कार्यपद्धत होय,असे समजावे लागेल? 

          याचबरोबर शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावर रुपये जमा करण्यासाठी कमी मनुष्यबळाचे कारणे दाखवून जमणार नाही हे सुद्धा शासन-प्रशासनाने गांभीर्याने लक्षात घेतले पाहिजे,असाच प्रकारचे म्हणणे विदर्भातील हजारो शेतकऱ्यांचे आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com