कमलसिंह यादव
साहाय्यक जिल्हा प्रतिनिधी नागपूर ..
कन्हान -. नागपूर – जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर,तद्वतच कन्हान जवळ चक्रधर पेट्रोलपंप असून या पेट्रोलपंपावर दोन लुटेरेखोरांनी देशी कट्टा व चाकूचा धाक दाखवून ८ हजार रुपये लुटून पसार झाल्याची धक्कादायक घटना ७ नोव्हेंबरच्या रात्रोला घडली आहे.
कन्हान परिसरात व ग्रामीण भागातंर्गत कन्हान परिसरात पोलिसांना आव्हान देत दिवसेनदिवस गुन्हेगार आपल्या वेगवेगळ्या युक्त्या नुसार गुन्हे करीत असून,गुन्हेगारांच्या गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येते आहे.सदर वाढणाऱ्या गुन्हेगारांच्या प्रवृत्त्यांमुळे परिसरातील नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार दि.७ नोव्हेंबरला रात्री १२: ४५ ते १:०० वाजताच्या दरम्यान फिर्यादी अनिल गजानन मस्के वय ४१ वर्ष रा.राजेगाव हा नेहमी प्रमाणे चक्रधर पेट्रोलपंपावर कामावर हजर असुन त्याचासोबत १) सावन वाघधरे वय २२ वर्ष २) विशाल वानखेडे वय २९ वर्ष ३) संकेत शेंडे वय २० वर्ष असे चार व्यक्ती सुध्दा पेट्रोलपंप येथे हजर असतांना आरोपी रोहित यादव वय अंदाजे २२ वर्ष व त्याचा सोबती हे दोघेही आपल्या युनिकाॅन काळ्या रंगाचा दुचाकी वाहनाने पेट्रोल पंपवर आले.
आरोपी रोहित यादव हा नेहमीच पेट्रोल पंपवर पेट्रोल भरण्यासाठी येत असतो व तो येथील राहणारा असल्याने त्याला अनिल मस्के व त्यांचे साथीदार चांगल्या प्रकारे ओळखत असुन आरोपी रोहित यादव ह्याने संकेत शेंडे यांचे पाॅईंट वरुन आपल्या दुचाकी वाहना मध्ये २०० रुपयाचा पेट्रोल भरायला सांगितल्याने संकेत शेंडे ह्याने त्याचा वाहना मध्ये २०० रुपयाचे पेट्रोल भरले व वाहन थोडी समोर थांबवुन आरोपी रोहित यादव यांनी संकेत शेंडेला चिल्लर आहे का?असे विचारले असता संकेत शेंडे यांनी त्याला चिल्लर देण्यासाठी खिश्यातुन धंद्याचे २६०० रु हातात काढले असता आरोपी रोहित यादव ह्याने संकेत शेंडे कडील सर्व रुपये जबरीने हिसकावुन घेतले व सावन वाघधरे याला रोहित यादव ने विचारले कि “तुझ्या कडे किती चिल्लर आहे” असे म्हणून आपल्या सोबत आणलेला देशी कट्टाचा धाक दाखवुन त्याचा कडुन धंद्याचे ४ हजार ६२० रु हिसकावुन घेतले व आरोपी रोहित यादव ह्याचा सोबत आलेला त्याचा साथिदार ह्याने अनिल मस्के याला चाकु दाखवुन त्यांचा कडून धंद्याचे १ हजार रुपये हिसकावले व एकुण ८ हजार २२० रुपये घेऊन दोन लुटेर पसार झाले.
या घटनेनंतर कन्हान पोलीसांनी फिर्यादी अनिल मस्के यांच्या तक्रारी वरून पो.स्टे.ला आरोपी १) रोहित यादव २) रोहित यादव ह्यांचा साथिदार यांच्या विरुद्ध अप क्रमांक ६४६/२२ कलम ३९२,३४ भांदवि सहकलम ३,२५ , ४,२५ भा.ह.का अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी व कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.