देवयानी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनी हॉकीमध्ये राज्यस्तरावर….

प्रेम गावंडे 

उपसंपादक 

दखल न्युज भारत 

            सिंदेवाही : देवयानी इंटरनॅशनल स्कूलच्या 19 वर्षांखालील मुलींच्या हॉकीपटूंनी आरमोरी येथील विभागस्तरीय हॉकी स्पर्धेत नागपूर संघावर 2-0 असा विजय मिळवून राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी निवड झाली. यावेळी आदरणीय संचालक निखिल तुकदेव, प्राचार्य रितेश चांदेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.

           विजेत्या विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक, मुख्याध्यापक आणि त्यांचे क्रीडा शिक्षक मोहित साखरे यांचे आभार मानले आणि श्रेय दिले. हॉकीपटू मिताली गोठा, सुशीला वछामी, शर्वरी घोडाम, आध्या भगत, वैष्णवी सुरपाम , वेदिका उईके, हर्षदा चौधरी, सुहानी आत्राम, श्रुती कुमरे, ईशा दोडके, प्रियंका श्रीरामे, प्राची सिडाम, कल्याणी कांडो, जानवी सिडाम, श्रुती कुमरे, नंदिनी कुळमेथे, सुहानी आत्राम , एकता मडावी यांना पुढील स्पर्धेसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.