सैय्यद ज़ाकिर
जिल्हा प्रतिनिधि वर्धा
गत दि.07/10/2024/रोजी रात्र दरम्यान स्थानीय गुन्हे शाखा ,वर्धा येथे पथक हजर असताना मुखबिर द्वारे खबर मिळाली की एक लाल रंगाची पुंटो कंपनीची एम. एच. 40 ए.सी.7260 नम्बरच्या कार मधून विदेशी दारूचा माल घेऊन जाम मार्गे वदनेर येथे जानार आहे.
अश्या माहिती वरूण त्याच्यावर शेडगाव चौक येथे नाके बंदी करुण प्रो रेड केला असता आरोपी नामे राज अनिल सोमया वय 22वर्ष व नकुल देवीदास आंबट कर वय 35 वर्ष दोन्ही रा,वार्ड क्र.03, वदनेर ता. हींगनघाट जी.वर्धा यांच्या माध्यमातुन सहा खरड्याच्या खोक्यात रॉयल स्ट्रॉन्ग कंम्पनीचा 180 एम.एल.ची 288 सीलबंद सिश्या व एक लाल रंगाची फियाट कंम्पनीची पुंटो एम, एच 40 एसी,7260 क्र.ची कार असा एकुण 6,000 ,800 /रू चा मुद्देमाल जप्त केला.
दोन्ही आरोपी विरुद्ध पुलिस स्टेशन समुद्रपुर येथे गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक अनुराग जैन ,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.सागर कवडे,यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस अमलदार हमीद शेख, सचिन इंगोले,श्रीकांत खडसे,राजेश तिवस्कर,प्रमोद पिसे,रामकिशन इप्पर,आशीष गौरी,विकास मुंडे,अरविंद इंगोले,उदय सोलंकी,सर्व नेमनुक स्थानीय गुन्हे शाखा वर्धा यानी केली आहे.