संपादकीय
प्रदीप रामटेके
काॅंग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा अंतर्गत,”पायदळ यात्रा,करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय आत्मविश्वासी व दृढ निश्चयाने ओतप्रोत असल्याचे दिसून येते आहे.
एका शाही राजकीय घराण्यात दैनंदिन सुखसोयी अन्वये जिवन जगणाऱ्या राहुल गांधींनी कन्याकुमारी ते कश्मिर पर्यंत ३ हजार ५७० किलोमीटर अंतर चालण्याचा घेतलेला निर्णयच स्वयं त्यांच्यासाठी आत्मप्रेरणादायी व आत्म अनुभवी असणार आहे.
१२ राज्यांतर्गत १५० दिवस सातत्याने ३५७० किलोमीटर अंतर कापने सहज शक्य नाही.. मात्र या भारत जोडो पदयात्रा अंतर्गत वेदना – दु:ख – संकल्पना – उदिष्ट – ध्येय – दृढ निश्चय – आत्मविश्वास समाविष्ट असल्याने सदर,”भारत जोडो पदयात्रा,भारत देशातील नागरिकांना योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम करु शकते आणि क्रांतीकारक असी परिवर्तनवादी सुध्दा ठरु शकते.
राहुल गांधी हे,”आयत्या बिडातील नागोबा,असल्याची किंवा पप्पू म्हणून त्यांना हिनविण्याची जि कार्यपद्धत भारत देशात सुरू आहे,”ती फक्त, यासाठी की,या देशातील बेरोजगार व मतदार त्यांच्या योग्य विचारांकडे वळू नये म्हणून आणि केंद्रीय सत्तापक्षांच्या अयोग्य विचारांना दिर्घकाळ ओळखू नये यासाठीच!
परंतु भारत जोडो यात्रा पुर्व दिल्ली येथे ३ सप्तेंबरला रामलीला मैदानावर काॅंग्रेसची झालेली माहागाई विरोधात,”हल्ला बोल सभा,देशातील नागरिकांना बोलकी आणि सतर्क करणारी होती हे अमान्य करता येत नाही.
भाजपचे भावनात्मक विचारांचे राजकारण जास्त काळ टिकणारे नसले तरी,”त्यांच्या केंद्रीय सत्ता काळात,भारत देशातील बहुजन समाजाचे सर्व स्तरावर अतोनात नुकसान होत आहे,विविध प्रकारे शोषण होत आहे आणि शिक्षणापासून बहुजन विद्यार्थ्यांना वंचित केले जात आहे,हे सत्य लपवून लपवता येत नाही.मात्र भाजपच्या सत्ता काळातंर्गत भारतीय नागरिकांचे न भरुन काढणारे झालेले नुकसान भारतीय नागरिक समजून घेण्यास केव्हा समजदार बनतील हे नक्की सांगता येणार नाही.
म्हणूनच काॅंग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपच्या द्वेषी,क्रोधी आणि या विचारातंर्गत एकमेकांना तोडणाऱ्या भेदभाव नितीचा कटाक्षाने केलेला जबरदस्त विरोध गांभीर्याने घेणारा आहे व तितकाच संवेदनशील आहे.
दुसरे असे की त्यांनी हल्ला बोल सभेत,”भारतीय नागरिकांना,पोटतिडकीने आवर्जून सांगितले आहे की,”भारतीय संविधान,आहे म्हणून आम्ही आहोत,आमचे अस्तित्व आहे.अर्थात आमचे अधिकार – हक्क भारतीय संविधानात अंतर्भूत असल्याने आम्हाला माणूस म्हणून जगता येते,नेतेगीरी करता येते,सत्ताधिश बनता येते,एकसंघतेची सामाजिक व राजकीय शक्ती निर्माण करता येते.
हल्ला बोल सभेतच अमुल्य असा संवेदनशील अर्थ राहुल गांधी यांनी स्पष्ट केला की भारतीय संविधान नाही तर आमचे अस्तित्व शून्य आहे.— “भारतीय संविधान नाही तर आमचे अस्तित्व शून्य आहे,— म्हणूनच आम्ही भारतीय संविधान कोणत्याही परिस्थितीत वाचविलेच पाहिजे.
राहुल गांधी यांनी रामलीला मैदानावर हल्ला बोल सभेत डागलेली वैचारिक तोफ साधी व सोपी अजिबात नव्हती हे काॅंग्रेस पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रथमतः मनात घुसवले पाहिजे व राहुल गांधी यांच्या वैचारिक भूमिका अंतर्गत देशातील नागरिकांना जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने प्रयत्न केले पाहिजे असाच तो राहुल गांधी यांचा संदेश आहे..
तद्वतच काॅंग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या योग्य वैचारिक भूमिकांकडे देशातील तमाम नागरिकांनी आतातरी दुर्लक्ष करु नये.अन्यथा देशातील बहुजन समाजासाठी काळजी करणारा आव्हानात्मक काळ येणार आहे हे त्यांनी विसरू नये.
भाजपाची द्वेषातंर्गत वैचारिक राजकीय कारकीर्द व कार्यपद्धत देशाच्या सार्वभौमत्वासाठी व देशातील नागरिकांसाठी अतोनात नुकसानदायक असल्याचे राहुल गांधी मानतात.म्हणूनच देशातील नागरिकांना सावध व जागरूक करण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो पदयात्रा काढली व ते सर्व प्रकारच्या सुखसोयी बाजूला ठेवून स्वतः पायदळ यात्रा करीत,यात्रेचे नेतृत्व करीत आहेत हेच भारत देशातील नागरिकांनी समजून घेणे गरजेचे व आवश्यक आहे..