पंकज चहांदे
देसागंज/वडसा तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
देसाईगंज – आरमोरी विधानसभा क्षेत्रात दरवर्षी पुरपरिस्थीत निर्माण होऊन अनेकांचा संपर्क तुटतो. नदी काठावर असलेल्या शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्या पिकांचे सर्व्हे करण्याचे निर्देश सबंधित अधिकाऱ्यांना देण्यात यावे.
तसेच आरमोरी विधासभा क्षेत्रातील घरकूल लाभार्थ्यांना उर्वरित रक्कम अद्यापही मिळालेली नाही.त्यासाठी आपण पाठपुरावा करावा अशी विनंती काँग्रेस नेते रामदास मसराम यांनी खासदार डॉ. किरसान यांच्याशी चर्चा करतांना केली.
काँग्रेस नेते रामदास मसराम यांनी खासदार डॉ. नामदेव किरसान यांची दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे भेट घेतली. यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा केली. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील देसाईगंज, कुरखेडा, कोरची, आरमोरी या तालुक्यांचा समावेश आहे. क्षेत्रातील बहुतांश शेतकरी वर्ग असून या भागात अजूनही शेतकऱ्यांना 24 तास लाईट उपलब्ध झालेली नाही, त्यांच्या पायाभूत सुविधांचा विकास झाला नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. यावेळी मसराम यांनी विविध समस्यांवर डॉ. नामदेव किरसान यांच्याशी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे भेट घेऊन चर्चा केली.
चर्चेदरम्यान आरमोरी विधानसभा क्षेत्रात घरकूल लाभार्थ्यांना उर्वरित रकमेचा त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्याच्या शेतीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी.आरमोरी क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना अखंडित २४ तास विज पुरवठा करण्यात यावा. वाढलेले विज दर कमी करून स्मार्ट मिटर योजना तत्काळ रद्द करण्यात यावी.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी आदी समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन, पुढाकार घेण्याची विनंती काँग्रेस नेते रामदास मसराम यांनी खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्याकडे दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथील भेटी दरम्यान केली. यावेळी कोरची तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज अग्रवाल उपस्थित होते.
दरम्यान या समस्येकडे दुर्लक्ष होणार नाही यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन डॉ. किरसान यांनी मसराम यांना दिले.