सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली,राष्ट्रपिता महात्मा गांधी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली व आनंदनिकेतन महाविद्यालय वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय ज्ञान प्रणाली व समाजशास्त्र या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेला उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले गोंडवाना विद्यापीठचे प्रकुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी भारतीय ज्ञान प्रणाली जगविख्यात असून राष्टीय शैक्षणिक धोरणामध्ये त्याचा आवश्यक विषय म्हणून समावेश करण्यात आलेला आहे असे सांगितले.
तद्वतच या विषयातील ज्ञान विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन कावळे यांनी केले.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीप गड्डमवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ.ए.चंद्रमौली,प्राचार्य डॉ.मृणाल काळे,कार्यशाळेचे समन्वयक डॉ. दिलीप कामडी,डॉ.दिवाकर उराडे,डॉ.रंजना लाड आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यशाळेचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ऐ.चंद्रमौली यांनी केले.
याप्रसंगी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यामध्ये आवश्यक असलेल्या भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर डॉ.विवेक जोशी,डॉ. देवदत्त तारे यांनी मार्गदर्शन केले.
समाजशास्त्र या विषयावर डॉ.मृणाल काळे,डॉ.रंजना लाड,डॉ.पंढरी वाघ,डॉ.पिलगुलवार,सोहळ्याचे संचालन डॉ.राजश्री मार्कंडेवार यांनी मार्गदर्शन केलं तर आभार डॉ. रामचंद्र वासेकर यांनी मानले.
कार्यशाळेच्या यशस्वीकरिता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .