मोदी – शहा तुम्हाला भारताचा बांगलादेश करायचा आहे का?  — आणि आम्ही ( भारतीय जनतेला ) तो होऊ द्यायचा का?

        कालच्या पहिल्या भागावर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या की, सर आमच्या देशात अशा प्रकारचा उठाव होऊच शकत नाही. किंवा सर अशा मोदी शहाच्या विरोधात पोस्ट आमच्या ग्रुपवर नको.वगैरे वगैरे…..

            अशा प्रकारच्या प्रतिक्रियेतून एक गोष्ट लक्षात येते की,जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून जो आम्ही टेम्भा मिरवितो ना……

      हा केवळ भ्रम आहे…

        अशा प्रतिक्रिया देणाऱ्यांची काहीही त्यात चूक असते असंही नाही. किंवा त्यात आश्चर्य सुद्धा काही नाही…..

        मुळात आमच्यात जी राजकारण्यांची व राजकीय पक्षांची अन्याय सहन करण्याची शक्ती एवढी अफाट आहे की, तिला जगात तोड नाही…

       दुसरे असे की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अवघ्या 65 वर्षाच्या संघर्षमय आयुष्यात सर्वात महान कार्य करण्यासाठी जीवन वेचले ते म्हणजे संसदिय लोकशाही व संविधान जे आपल्याला प्रदान केले.त्यांना आम्ही आर्याच्या कुसांस्कृतिक गुलामीच्या चष्म्यातून बघत असल्यामुळे त्या संविधानाच्या सागरात तळाशी असलेल्या मोत्याकडे आम्ही साधे बघुही शकत नाही.हे आणि असे कितीतरी मुख्य कारणे या प्रतिक्रियेत दडलेली आहे…

            त्यांची अशी प्रतिक्रिया येणे यात नवल ते कसे असणार? कारण हजारो वर्षाच्या कुसांस्कृतिक आक्रमणाच्या मानसिक गुलामीच्या अंधःकारात असणाऱ्या समाजाला व देशाला जर संविधान क्रांतीतून भर दुपारचा तळपता सूर्य दाखवला तर डोळे दिपणारच ना….!

     म्हणून गेल्या 75 वर्षांपासून आम्ही अजूनही डोळे चोळत आहोत…..!!!

      म्हणून आमची ( भारतीय जनतेची ) मानसिकता अशी झालेली आहे.

           की,जोपर्यंत हा उठाव,या दाहक परिणामाचे चटके

आमच्या देशात…….

 आमच्या राज्यात…..

आमच्या विभागात …….

आमच्या जिल्ह्यात……..

आमच्या तालुक्यात…….

आमच्या शहरात किंवा गावात……

आमच्या गल्लीत…….

आमच्या घरात…..

आमच्या शरीरात……

         पोहचत नाहीत तोपर्यंत आम्हाला त्याचे गांभीर्य लक्षात येत नाहीत.हीच तर खरी अन्याय सहन करण्याची सहन शिलता आहे. जी या कुसंस्कृतीने प्रदान केलेली आहे.!

         आमच्या शेजारची श्रीलंका हिचा इतिहास पहा, महागाई बेरोजगारीमुळे काय अवस्था आज झालेली आहे?

       आमच्या देशाच्या स्वातंत्र्य युद्धातून जन्मलेल्या पाकिस्तानची अवस्था पहा,तो देश कसा उठावाच्या उंबरठ्यावर आहे तो.

         आज जी बांगलादेशाचा जो उठाव आहे त्यात नवल वाटण्याचे कारण नाही. कारण नैसर्गिक सिद्धांत्तानुसार “अती तिथे माती “होणारच!

      बांगलादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी 2008 पासून विरोधी पक्षांच्या नेत्यांना तुरुंगात डांबून नावालाच लोकशाहीच्या नावाने निवडणुका लढविल्या. परिणामी विरोधकांनी या नाटकी निवडणुकावर बहिष्कार टाकला.म्हणून त्या एवढी वर्षे सत्तेवर होत्या.सत्ता टिकविण्यासाठी त्यांनी प्रथम विरोधी पक्षांचे पंख छाटले….

          महामानव जॉर्ज वॉशिंगटन ( अमेरिकेचे प्रथम राष्ट्राध्यक्ष ) म्हणतात, ” लोकशाहीत दुसऱ्यांदा पद उपभोगणे. म्हणजेच विभूतीपूजेतून हुकूमशाहीला आमंत्रित करणे होय. “

        त्याचप्रमाणे महामानव, महासुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,”लोकांची लोकशाहीतील विभूतीपूजा लोकशाहीला आत्मघाताकडे नेणारी आहे.”

          त्यामुळे अशा महामानवांच्या इशाऱ्याकडे गेली 75 वर्षात आम्ही पाहू शकलो नाही. हे आमच्या सुशिक्षित पिढीचे अपयश आहे.

       ज्या पद्धतीने शेख हसीना यांनी अन्यायकरक पद्धतीने देश चालवीला त्याचा आगडोंब आता उसळून वर आल्यामुळे पळून जाऊन भारताचा आश्रय का घ्यावा लागला ? त्या पाकिस्तानमध्ये का गेल्या नाहीत?

           कारण आमचे देशाचे सरकार सुद्धा 2014 पासून शेख हसीनाच्या धर्तीवरच देश चालवत आहेत.येथील मोदी -शहा EVM च्या जनतेच्या व सर्वोच्च न्यायालयातील वकिलांच्या विरोधाला जुमानत नाहीत. मुख्यविरोधी पक्षांच्या नेत्यांना ईडी चा धाक दाखवून तुरुंगात डांबन्यात येत आहे. छोट्या छोट्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना असाच धाक दाखवून, प्रसंगी हड्डी फेकून शेपूट हलवत आनंदाने हे भ्रष्टाचारी नेते मोदी – शहाचे गळ्यातील पट्ट्याचे राखणदार ( अजित पवार, एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण ) बनले.

            85 % जनतेला मोफत 15 किलो दरमहा रॅशन देऊन मोदी – शहाने जनतेला शरमिंधे करून टाकले. EVM ला हॅक करून तिसऱ्यांदा खुर्चीवर बसण्यात ही जोडगोळी यशस्वी झाली. 

         महागायी तर गगनाला भिडलेली आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक तत्वज्ञानुसार कोणत्याही काळात एका तोळ्याच्या सोन्याची किंमती एवढी रक्कम सर्वसामान्य जनतेतील प्रत्येक कुटुंबाचे निदान दरमहा उत्पन्न पाहिजे.तेंव्हा कुठे अर्थव्यवस्था ठीक आहे, असेल म्हणता येईल.” मोठ्या मुश्किलीने आज 10/12 /15 हजार रुपये कुटुंबाचे मासिक उत्पन्न आहे आणि सोन्याचा भाव 70000/- रुपये आहे. ही आहे गरीब आणि श्रीमंतीची दरी. मुकेश अंबानीच्या मुलाचे लग्न एकीकडे तर दुसरीकडे सर्वसामान्यांची अवस्था ही,”जगता – जगता मरण्याची व मरता – मरता जगण्याची धडपड,अशीच तर उठावाची कारणे बांगलादेशात कारणीभूत ठरली!

      तर मग आमचा देश याहून वेगळा कसा?

        एकीकडे हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेऊन बुडवून देश सोडणाऱ्यांना बँका आणि सरकार पाठीशी घालते. तर दुसरीकडे 10 / 20/50/100 हजार रुपये कर्ज घेणाऱ्यांचे घर जप्त करते. प्रसंगी त्यांच्यावर कार्यवाही करते.

       ही बांगलादेशाच्या दिशेने जाण्याची भारताची लक्षणे नव्हेत का?

       हे सर्व टाळायचे असेल,”तर,अजूनही वेळ गेलेली नाही…

      त्यासाठी भारताच्या संविधानाला समजून घेऊन प्रत्येकाने त्यातून डोळसपणे जागृत होऊन कृती करणे आवश्यक आहे…..

      अन्यथा बांगलादेशाच्या परिणामाचे स्वागत करूया……..!!!!””

         जागृतीचा लेखक

           अनंत केरबाजी भवरे

  संविधान विश्लेषक,औरंगाबाद,रेणापूरकर, 7875452689…