शेतात रोवणी करतांना नवयुवक शेतकऱ्यांचा सर्प दंशाने मृत्यू…

    राकेश चव्हाण 

तालुका प्रतिनिधी कुरखेडा 

           कुरखेडा तालुक्यातील सावरगाव येथे नवयुवक शेतकरी करन संजय उईके वय 22 वर्षे हा काल शेतात रोवणीचे काम करीत असताना विषारी साप चावल्याने त्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सकाळी घडली.

          करण मुळ भरनोली (बोरटोला) या गावचा रहिवासी असुन तो आपल्या मावशी कडे रोवणी निमित्त सावरगाव ईथे आला होता.सर्प दंश झाल्याचे कळताच रुग्णालयात नेण्यास १०८ क्रमांक ला फोन केला.सती नदीच्या रपटा खचल्याने रुग्णवाहिका उशीरा येईल असे कळविण्यात आले.त्यामुळे खाजगी वाहनाने उपजिल्हा रुग्णालयात उपचार करीता व्हाया आंधळी फाटा नेण्यात आले.

        परंतु अंतर लांब असल्याने पोहोचण्यास उशीर झाला व उपचार सुरू करण्या अगोदरच त्याचा मृत्यू झाला.नातेवाईकांनी याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा पत्रकार राम लांजेवार यांना दिली.

          त्यांनी रुग्णालयात जाऊन माहिती घेतली असता सर्प दंश झालेल्या युवकास तात्काळ रुग्णालयात उपचार करीता आणले असते तर त्याचा जिव वाचु शकला असता.परंतु सावरगाव ते कुरखेडा हे अंतर अतिरिक्त पंधरा की.मी.ने जास्त झाल्याने वेळेत ते पोहोचु शकले नाही.

          शासनाने करणच्या पालकास तात्काळ मदत करावी व रपटा त्वरित दुरुस्ती करून वाहतुक सुरु करावी अशी मागणी राम लांजेवार यांनी केली आहे.