युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
स्थानिक दर्यापूर येथील एक मात्र सीबीएसई मान्यता प्राप्त शाळा असलेल्या एकविरा शाळेत दर्यापूर मधील डॉ.रविंद्र साबळे व डॉ.माधुरी साबळे यांचे चिरंजीव आदित्य साबळे यांची असिस्टंट कमांडर म्हणून निवड झाल्याबद्दल,तसेच देशामधून 21 वा क्रमांक पटकावल्याबद्दल एकविरा परिवार दर्यापूरच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियंट्सच्या सहसचिव सौ. पूनम विजय पनपालिया व प्राचार्य लिजेश रामकृष्ण यांच्या हस्ते आदित्य साबळे यांचा शाल व बुके देऊन पेढे भरवत कौतुक केले.
दर्यापूर शहराचे नाव संपूर्ण भारत भरात गाजवल्याने नक्कीच हे अभिमानास्पद बाब असल्याचे एकविरा परिवाराच्या वतीने व्यक्त करण्यात आले.आदित्य साबळे हे उत्कृष्ट क्रिकेटपटू सुद्धा आहेत. त्यांनी अनेक स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता.आज त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
सत्कार करताना सौ.पुनम विजय पनपालिया,प्राचार्य लिझेश रामकृष्ण,उपप्राचार्या उज्वला गायकवाड,प्राचार्य राजेंद्र ताटस्कर,प्रा.वैशाली भरत ठाकरे,डॉ.विठ्ठलराव साबळे,आदित्य साबळे,अनुराग साबळे,सागर श्रीराव,अरविंद वर्धेकर,गोकुल कोरडे,विजय शिरसाठ,प्रवीण रावणकर,गौरव टोळे,विकी नांदुरकर,प्रतीक हरणे,अजय कुकटकर,योगेश लोहकपुरे,सह एकविरा परिवाराचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थीगण बहुसंख्येने उपस्थित होते.