जगद्गुरु संत तुकोबारायाच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सराटी नगरीतील ग्रामस्थ सज्ज, तर मुक्कामा ठिकाणी मंडपाची जय्यत तयारी…

  बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी

         सराटी तालुका इंदापूर पावन नगरीत गुरुवार दिनांक 11 जुलै रोजी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मुक्कामी येत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने वारकरी बांधवांना सर्व प्रकारच्या सुविधा देण्यासाठी सराटी नगरीत जय्यत तयारी करण्यात आलेली आहे.

             सराटी गावचे प्रमुख,जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष हानुमंत कोकाटे, पंचायत समिती सदस्य प्रदीप मामा जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आण्णासाहेब कोकाटे, माजी सरपंच बापूसाहेब कोकाटे, महेशकाका जगदाळे, आमरभैया जगदाळे, मनोज जगदाळे रोहित जगदाळे, बाबासाहेब कोकाटे,सराटी ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ या सर्वांच्या वतीने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे, आलेल्या वारकरी व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचीही सोय मोठ्या प्रमाणात केलेली आहे.

        जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मैदान सराटी येथे चकाचक आणि स्वच्छ करण्यात आले आहे. भव्य आणि दिव्य मैदानामध्ये मंडप व्यवस्था लाईट डेकोरेशन करण्यात आलेली आहे.

          सराटी ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता, पाणी, आरोग्य व्यवस्था, शौचालये, नियंत्रण कक्ष, वाहनासाठी पार्किंग व्यवस्था आदी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, आशी माहिती सराटी येथील ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेले आहे.