दर्यापूर मनसे तर्फे संतापाची एक सही अभियान.. 

 

युवराज डोंगरे/खल्लार

          संपूर्ण देशाला संस्कृतीचे धडे शिकवणारा आपला महाराष्ट्र आज संपूर्णता राजकीय मंडळी मुळे चिखलमय झालेला असून याला जबाबदार असलेले राजकारणी,नेते मंडळी,मतदारांना वेठीस धरणाऱ्या भ्रष्टाचारी राजनेत्याचा निषेध करण्याकरिता मनसेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून ” संतापाची एक सही ” या अभियानाची महाराष्ट्रभर सुरुवात करण्यात आली आहे.

           दर्यापूर तालुक्यामध्ये सुद्धा संतापाची एक सही अभियान गांधी चौक,शर्मा पेट्रोल पंप येथे राबविण्यात आले.सदर अभियानामध्ये बँक अधिकारी,शिक्षक,इंजिनिअर,वकील,शेतकरी,विद्यार्थी,महिला,यांनी आपला सहभाग नोंदविला.

             सध्याच्या राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जनतेला या राजकीय नेते मंडळीचा वेठीस धरलेले आहे.

            आपण यांना आपले प्रतिनिधित्व करायला सभागृहात पाठवतो आणि हे लोक आपलाच विश्वासघात करतात.कोणताच पक्ष आज मतदारांच्या भावना जपून ठेवत नाही, आजच्या स्थितीत शेतकरी,विद्यार्थी,मेडिकल,रोजगार इत्यादी बाबत समस्या असताना हे सर्व सोडून हे आपल्या सत्तेच्या मस्तीत व्यस्त आहेत.

          अशातच मनसे या पक्षाने एक सही संतापाचे या अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.सदर अभियान मनोज तायडे तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये व पंकज कदम उपतालुका अध्यक्ष यांच्या नियोजनामध्ये करण्यात आले असून सदर अभियानाची सुरुवात मनसे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी गायगोले यांच्या स्वाक्षरीने करण्यात आली असून सदर कार्यक्रमाकरिता गोपाल तराळ जनहित तालुकाध्यक्ष, लकी गावंडे, राम शिंदे, प्रथमेश राऊत, संदीप झळके, अनिकेत सुपेकर ,सोपान धांडे ,संतोष रामेकर ,लोकेश तायडे, उमेश बुध ,संदीप कळसकर बंडूभाऊ सांगोले ,चव्हाण भाऊ इत्यादी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले आहे. सदर अभियानाला दर्यापूर येथील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे व राजकारणा प्रती संताप व्यक्त केलेला आहे.