प्रतिनिधी बाळू राऊत
घाटकोपर ता ९ , एकीकडे आषाढी एकादशी निम्मित पंढरपूर येथे वारकऱ्यांची मांदियाळी भरणार आहे.तर दुसरीकडे मुंबईत देखील आषाढी एकादशी निम्मित घाटकोपर विभागात भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.रविवार दि १० रोजी आषाढी एकादशी निम्मित घाटकोपर प्रगती मंच तर्फे यंदाच्या सहाव्या वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौक, जांभळीपाडा घाटकोपर येथे करण्यात आले आहे.या कार्यक्रमात उपवासाची खिचडी, केळी, तुळशी रोप वाटप करण्यात येणार आहे.त्याच बरोबर भव्य देखाव्यासह विठ्ठल पूजेची व्यवस्था करण्यात आली आहे.याच ठिकाणी अभ्युदय विद्यालय शाळेचे विध्यार्थी पारंपरिक वेशभूषेत दिंडी घेऊन येतील, त्याचे स्वागत केले जाणार आहे.पारंपरिक वारकऱ्यांची वेशभूषा करून या ठिकाणी घाटकोपर प्रगती मंच चे सर्व तरुण तरुणी उपस्थित राहून भजन , कीर्तन करणार आहेत.तरी या कार्यक्रमाला सर्व विठ्ठल भक्तांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढविण्याची विनंती घाटकोपर प्रगती मंच तर्फे करण्यात आली आहे.