पारशिवनी :-पारशिवनीग्रामपंचायतचे रुपांतर नगरपंचायतमध्ये होऊन चार वर्षे झालीत, मात्र आजही पारशिवनी शहर पूर्वीप्रमाणेच पहाला मिळत आहे. शहरात कुठलेच परिवर्तन झाल्याचे कुठेही दिसत नाही. शहरात नगरपंचायत झाल्यापासून शहराचा विकास कुठे हरवला तेच कळत नाही.

पारशिवनी हे अनेक वर्षांपासून तालुक्याचे ठिकाण आहे. असे असतानाही या शहरात वर्षानुवर्षे अनेक प्रश्‍न ‘आ’ वासून उभे आहेत. शहरातील अतिक्रमणाचा प्रश्‍न सुटता सुटत नाही. अनेक प्रभागांमध्ये सांडपाण्याच्या नाल्या नसल्याने सांडपाणी रस्त्यांवरून वाहत असते. त्यामुळे जागोजागी पाण्याचे डबके साचलेले नजरेस पडतात. मुलांना खेळण्यासाठी शहरात कुठेही क्रीडांगण नाही. त्यामुळे मुलांनी खेळायचे कुठे आणि कसे, असा प्रश्‍न उपस्थित होतो. १७ प्रभागांत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी नगरपंचायत ने ६ महिन्या आधी पासून श्रीनिल धकाते नामक ठेकेदाराला प्रति महिना ३लाख प्रमाने करार करण्यात आला आहे. त्यात प्रति दिन १५ ते २० हजार लोकसंख्या असलेल्या १७ प्रभागांमध्ये असलेल्या कुंटूबियाना स्वंच्छ पिण्याच्या पाण्याचे वितरण. नियोजन. देखरेख व इतर बाबी कडे लक्ष पुरविने. शहरात पाणी पुरवठा पेंच जलाशय फिल्टर प्लॅन व पालोरा पेंच नदीवरील विहिरीमधूंन करण्यात येतो. शहराच्या आजूबाजूला पाण्याचे भंडार विपुल प्रमाणात आहे. तरी पण पाणीपुरवठा करणाऱ्या ठेकेदारांच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरातील १७ ही प्रभागांमध्ये पाणीपुरवठा अनियमित आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या नागरिकांना पाण्यासाठी चातका प्रमाणे वाट बघावी लागते. -छोट्या खेड्यांचा विकास होत असताना पारशिवनी शहराची विकासाची गती का थांबली आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे

या शहरातील अनेक भागांत झालेल्या खोदकामांमध्ये आजवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती आढळल्या आहेत. या मूर्ती पुरातत्त्व विभागाने नागपूर येथील संग्रहालयात ठेवल्या आहेत. काही मूर्ती स्थानिक त्र्यंबकेश्‍वर देवस्थान येथेही पाहायला मिळतात. पर्यटनाच्या दृष्टीनेही या शहराला विशेष महत्त्व आहे, याचे कारणया शहराच्या सभोवताल असलेली पर्यटनस्थळे. शहरापासून जवळच प्रसिद्ध पेंच धरण, पेंच व्याघ्र प्रकल्प, कुंवारा भिवसन, घोगरा महादेव कान्हादेवी देवस्थान अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत. तरीही हे शहर विकासापासून कोसो दूर आहे.

शहरात उद्यान तयार करण्यात नगरपंचायत कमकुवत ठरली आहे. अनेक प्रभागात रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. शहरातील गांधी चौक, पेंच रोड ही स्थळे वर्दळीच्या ठिकाणी असून येथील अतिक्रमण नागरिकांसाठी तसेच वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या ठिकाणी नगरपंचायतने मात्र व्यवस्था केली नसल्याने वाहचालकांना त्रास होतो. अनेक ले-आउटमध्ये आजही उद्यानासाठी भूखंड रिकामे पडून आहेत. अनेकांनी त्यावर अतिक्रमण केले आहे. शिवाजी चौकात सौंदर्यीकरण करण्यासाठी जागा असूनही सौंदर्यीकरण झाले नाही.

स्थानिक आमदारांनी पारशिवनी शहराच्या विकासासाठी पाच कोटी रुपये मंजूर केले असल्याचे शहरात होर्डिंग लागले होते . तो निधी केव्हा येईल आणि केव्हा शहराच्या विकासास हातभार लागेल याची प्रतीक्षाच आहे. शहरात मात्र पाहिजे त्या प्रमाणात विकासाची कामे झाली असे आजतरी म्हणता येत नाही. शहराच्या विकासकामांसाठी खासदार आमदार निधी मिळाल्यास शहराचे रुपडे पालटू शकते; परंतु तो निधी मिळणार कधी आणि शहराचा विकास होणार कधी याची प्रतीक्षाच करावी लागणार.

साडेनऊ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, रस्ते अनुदानातील नगर उद्यान योजना, दलितोत्तर विकास निधी, दलित वस्ती विकासनिधी, पायाभूत सुविधा योजनेचा निधी, नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतचा विकास निधी तसेच जिल्हा नियोजन समितीचा आतापर्यंत एकही पैसा नगरपंचायतला विकासकामांसाठी मिळाला. क्रीडा विभागातूनही शहरातील क्रीडांगणे, व्यायामशाळा यांसाठी निधी आला. घरकुल योजनेच्या द्वितीय टप्पाचा निधी अद्याप बाकी आहे. १४ व्या वित्तीय आयोगातर्फे निधी मिळाला . स्थानिक नगरपंचायतला कुठल्याच मार्गाने पैसा येत नसेल तर शहराचा विकास होणार कसा? शहराला लागलेले ग्रहण केव्हा सुटणार. 

असा यक्षप्रश्न आता नागरिक विचारत. आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com