प्रितम जनबंधु
संपादक
आरमोरी:- हिंदूजननायक महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या विचारसरणी व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून, आरमोरी येथील महिलांनी दि. ८ जुलै २०२२ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्ष प्रवेश केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आरमोरी अध्यक्ष्या मा. विभाताई बोबाटे यांच्या जन्मदिवसानिमित्य वृक्षारोपण व पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री. रंजीतभाऊ बनकर, मनसे आरमोरी तालुका अध्यक्ष मा. राकेशभाऊ सोनकुसरे, मनविसे तालुकाध्यक्ष मा.शेषराज सोनकुसरे, उपस्थित होते याप्रसंगी शहरातील महिलांनी पक्षात प्रवेश केला मनापासूनअभिनंदन केले. यावेळी पक्षप्रवेशाला बहुसंख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना मा. रंजीतभाऊ बनकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना केवळ एक पक्ष नसून एक परिवार आहे. यात माता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या लेकींचा व महिलांचा सन्मान आदरपूर्वक केला जातो. आजची महिला पुरुषांबरोबर खांद्याला खांदा मिळून काम करतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सर्व महिलांना काम करण्याची योग्य संधी मिळते कुठलाही भेदभाव या ठिकाणी केला जात नाही आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उभे राहतील तेव्हा आपल्या सर्वांना जोमाने कार्य करायचे आहे असे मार्गदर्शन केले व पक्षप्रवेश केलेल्या महिलांना समोरच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी ज्योती बगमारे, ऊमा कोडापे, जयश्री कापकर, महानंदा शेर्डे, तूलसा उईके, सीमा मडावी, रोशनी झीमटे, अल्का पेटकूले, स्मीता उईके, तालुका प्रसिद्धीप्रमुख अशुतोष गिरडकर, प्रवीण दोनाडकर, दिवाकर गराडे उपस्थित होते.