वणी : परशुराम पोटे

 

वणी तालुक्यातील सर्व नागरीकांना सुचीत करण्यात येते की, नागपुर येथिल हवामान विभागाच्या अंदाजानुसार वणी तालुक्यात पुढील तीन दिवसात अतिवृष्टी होण्याचा इशारा दिलेला आहे. तरी वणी तालुक्यातील सर्व नागरीक यांनी तसेच नदी व नाल्या काठावरील नागरीकांनी महत्त्वाचे कामाव्यतीरीक्त घराबाहेर पडु नये. कोणत्याही पुलावरून पाणी वाहत असल्यास नागरीकांनी त्या पुलावरून वाहतुक करू नये. रांगणा ते वणी या रस्त्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने तसेच तो पुल खचला असल्याने कोणत्याही प्रकारची वाहतुक सदर रस्त्याने होणार नाही याची सर्व नागरीकांनी दक्षता घ्यावी. तसेच नैसर्गीक आपत्ती संदर्भात काही समस्या निर्माण झाल्यास, नैसर्गीक आपत्ती नियंत्रण कक्ष यवतमाळ – ०७२३२-२४०७२०,

 नैसर्गीक आपत्ती नियंत्रण कक्ष वणी – ०७२३९-२२५०६२,

 मा. तहसिलदार वणी मो.क्रं.- ९३७६८०९४१८, पोलिस निरीक्षक वणी- ८८८८८२५८९०,

पोलिस निरीक्षक शिरपुर – ९५२७८९८४८४,पोलिस निरीक्षक मुकुटबन – ९८२३३०८२३० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार वणी यांनी केले आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News