वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे

 

वाशिम:- कारंजा तालुक्यातील मसला येथील प्राथमिक शिक्षक बनारासे यांनी मुलांकडुन वरुणराजाला साकडे घातले.हे कृत्य करीत असताना मुलांच्या अंगातील कपडे काढून,त्याच्या अंगाला निबांचा पाला पाचोळा बाधून त्याला गावभर फिरविणे आणि अस्तित्वात नसलेल्या भ्रामक कपोल कल्पित गोष्टीचा प्रसार करीत पाण्यासाठी धोंडी मागण्याचे आणि असे गावात फिरल्याने पाणी येते अशी अविवेकी अंधश्रद्धा आणि तस्संम बाबीला खतपाणी घालणारी घटना नुकतीच ग्राम मसला येथे घडली असून सदर घटणे बाबत जिल्हा स्तरावर त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या असल्याने जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी गांभीरतेने या प्रश्नावर लक्ष देत संबधित बनारसे नामक शिक्षकास आपणास निलंबित का करू नये या बाबतची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.अधिक कृतासे की सदर ऊपक्रमाची एका वृत्तपञातुन दि.३ जुनला प्रसिध्दीही देण्यात आली आहे.सदर ऊपक्रमातुन अंधश्रध्देला खतपाणी मिळत असल्याने शिक्षकाच्या सेवाशर्ती नियमांचे भंग आहे.विद्यार्थ्यांना विज्ञानवाद शिकवायचे सोडुन अंधश्रध्दा जोपासणार्‍या असे कृत्य करवुन घेतल्यामुळे सर्व स्तरातुन रोष व्यक्त करण्यात येत असुन सदर शिक्षकाने कर्तव्यात नेमुन दिलेल्या कर्तव्याचा भंग केल्यामुळे त्वरीत निलंबित करावे अशा इतर शिक्षकामधूनही प्रतिक्रीया सोशल मिडीयावर ऊमटल्या आहेत.सदर ऊपक्रमातुन मुलांना बालपणापासुनच अंधश्रध्देच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न असुन सबंधितावर अंधश्रध्दा निमुर्लन कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदवावेत अशीही मागणी जोर धरत आहे.धोंडी प्रकरणाची वरिष्ठ प्रशासकिय स्तरातुन त्वरीत दखल घेवून शिक्षणाधिकारी यांच्या आदेशावरुन कारंजाचे गटशिक्षणाधिकारी यांनी सबंधित शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.याप्रकरणी पुढे शिक्षण विभाग काय कारवाई करते?की सबंधिताकडुन घेवुनदेवून प्रकरण सेटलमेंट होते याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.याप्रकरणी योग्य कायदेशीर कारवाई न झाल्यास महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ व मसला गावकरी मंडळींनी कायदेशीर रित्या आंदोलन करणार असल्याचे समजते . सदर शिक्षकासह स्थानिक मदत करणारे सहायक शिक्षक व वरिष्ठावरही कारवाईसाठी पाऊले ऊचलण्यात येणार असल्याचे कळले आहे.बःर्‍याच शिक्षक संघटना आणी इतर शिक्षकांनीही या धोंडी प्रकरणाचा निषेध केला असुन दोषींवर कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी केली आहे.कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी याप्रकरणी कोणती भुमिका घेतात याकडे शिक्षणविभाग आणी शिक्षणप्रेमीसह अंनिस आणी जिल्हावाशीयांचे लक्ष लागले आहे.

बॉक्स- लहानपणी डोक्यात अंधश्रद्धा घातल्याने त्याचे अनेक वाईट परिणाम होतात विध्यार्थी हा निपेकक्ष असला पाहिजे त्याचाडोक्यात देशप्रेम ,राष्ट्र प्रेम,माणुसकी, आदर विज्ञानवाद, निर्माण करून एक आदर्श निर्माण करण्याचं कार्य प्राथमिक शिक्षक कडून होणे गरजेचे आहे मात्र आज काल शाळे तून अंधश्रद्धा पसरविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे ही बाब निदनिय असून त्यातून शाळेतून आदर्श निर्माण करण्यासाठी अनेक शिक्षक कसोटीचे प्रयत्न करीत असताना दिसतात मात्र अश्या अंध श्रद्धा असलेल्या शिक्षका मुळे त्यांनाही अशा प्रकारचा त्रास होतो आहे .त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे उल्लघन झाले असून सदर शिक्षकावर कार्यवाही व्हावी…त्याला धडा बसावा अन्यस्था आम्ही आंदोलन करू….आरीफ पोपटे तालुका अध्यक्ष 

महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ.

 

आशिष धोंगडे

वाशिम प्रतिनिधी

दखल न्युज भारत

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com