दख़ल न्यूज़ भारत

शंकर महाकाली

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

 

बल्लारपुर:स्वातंत्र्याचा ७५ व्या वर्षी अमृत महोत्सव निमित्त महाराष्ट्र शासन वन विभाग मार्फत राज्यातील निवडक ७५ रोपवन स्थळावर समांरभपुर्वक वृक्षलागवडीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आले.याच अनुशंगाने दिनांक ०८ जुलै २०२२ ला कारवा-बल्लारशाह रस्ता लगत असलेल्या मिश्र रोपवन २०२२ मध्ये वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्या अध्यक्षतेत व प्रमुख उपस्थिती हरीश शर्मा,माजी नगराध्यक्ष न.प बल्लारपुर,प्रकाश लोणकर मुख्य वनसंरक्षक चंद्रपुर वनवृत्त चंद्रपुर, यांच्या उपस्थितीत भव्य वृक्ष लागवड करुन वनमहोत्सव साजरा करण्यात आला.या प्रसंगी बडेकर विभागिय वनाधिकारी,श्रीकांत पवार सहाय्यक वनाधिकारी हे अतिथी उपस्थित होते.या प्रसंगी हरीश शर्मा यांनी उपस्थितांना संबोधित करतांना सांगीतले की आ.सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री असताना महाराष्ट्रात ५० कोटी वृक्ष लागवडीचे स्वप्न अथक परिश्रम घेत पूर्ण केले.ती वृक्ष लागवड फक्त शासकीय यंत्रणे पुरतेच सिमीत न राहता जन आंदोलनाचे स्वरूप घ्यावे करीत प्रयत्न केले. आणि त्याचा परिणाम देखील दिसून आला.जंगलाची रास होणे जरी आपल्या आटोक्यात नसले तरी जनआंदोलन घडवून वृक्ष लागवड करुण जंगले वाढवु शकता येतात याची प्रचिती यावेळी प्रत्यक्षात आली.आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त वृक्ष लागवड करताना परत एकदा आ.सुधीर मुनगंटीवार लवकरच वृक्ष संवर्धनाने धरणी मातेचे ऋण फेळण्याची संधी परत देण्याकरिता लवकरच आपल्या सोबत असतील असा विश्वास व्यक्त केला.याप्रसंगी नरेश भोवरे,सखी मंचाचे,किरण दुधे,श्रीमती विणा झाडे,देशकर मैडम,टिपले मैडम, येगीनवार, मुलकरवार,कष्यप व वनकर्मचारी तसेच एन,सी, सी केडेट, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संचालण:रामटेके,वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी केले. आभार:कोमल घुगलोत,क्षेत्र सहाय्यक बल्लारशाह,यांनी केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News