पुणे जिल्हा प्रतिनिधी
आषाढी एकादशीनिमित्त आळंदी ते पंढरपूर सुरू झालेल्या आषाढी वारीसाठी अनेक भाविक आपआपल्या परीने वारकर्यांची सेवा करत आहे. ह्यात मग राजकीय पक्ष, नेते, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच संस्था वारकर्यांच्या सेवेत आहेत.ह्या वारकर्यांच्या सेवेसाठी मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील संत कृपा हाॅस्पिटलची संपूर्ण टीम आषाढी एकादशीनिमित्त बरड येथे मोफत आरोग्य सेवा देत आहेत.ह्यामध्ये हाॅस्पिटलचे डाॅक्टर शरद चव्हाण, डाॅ श्रीकांत वेंकटरमण देखील मोफत आरोग्य तपासणीसाठी वारकर्यांच्या सेवेत आहेत.विशेष म्हणजे ह्याच तालुक्यातील बोतरवाडी गावचे विशाल निंबाळकर देखील ह्या टीम मध्ये सहभागी होऊन वारकर्यांची सेवा करत आहेत.वारकरी सेवा म्हणजे साक्षात पांडुरंगाचे दर्शनच आहे, ह्या भावनेनेच संपूर्ण टीम कार्यरत आहे. ह्या कामाचे मुळशी तालुक्यातून भरभरून कौतुक होत आहे.