वणी:- परशुराम पोटे
येथून ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या रांगना गावाजवळील गायकवाडी नाल्यावरील पुल कोसळून पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
वणी ते रांगना भुरकी असा मार्ग असून या मार्गांवर असेलेले गायकवाडी नाल्यावरील पुल अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे. या पुलाच्या दुरुस्तीबाबत बांधकाम विभागाला गावाकऱ्यानी अनेकदा निवेदन दिलेले आहे. परंतु गावाकऱ्याच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर हा पुल कोसळून पुरात वाहून गेला आहे. वणी रांगना भुरकी हा सतत चालणारा वळदळीचा मार्ग असून बऱ्याच गावाचे प्रवासी या मार्गाने प्रवास करीत असतात. तसेच विध्यार्थी व शेतकरी वर्गकारिता हा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. सध्या शेती हंगाम सुरु असून शेतकऱ्यांना शेतीच्या मशागती करिता याचं मार्गाचा वापर करावा लागतो,परंतु पुल कोसळल्यामुळे मार्ग पूर्णपणे बंद झाला असून नागरिकांना प्रचंड असा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रहदारी बंद झाल्यामुळे शेतकऱ्याच्या शेती पिकाचे फार मोठे नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे पुलाची त्वरित दुरुस्ती करून वाहतूक पूर्ववत करा अशी मागणी रांगना गावाकऱ्यानी केली असून पुलाचे काम त्वरित सुरु न केल्यास गावकऱ्यामार्फत बांधकाम विभागाला घेराव करू असा इशारा रांगना ग्रामपंचायत उपसरपंच अँड्. दिलीप परचाके,सरपंच सौ रंजना प्रकाश बोबडे,रविकांत वांढरे,धर्मराज जरीले,प्रकाश बोबडे,महादेव कतकर, राजेश वांढरे,दौलत दुर्गे,रामनाथ जरीले,नीलकंठ गोंडे,शेखर वांढरे,रमेश भोयर,प्रकाश बोढे, सुरेश पारशिवे, गंगाराम शिवरकर, नवरंग तेलंग, मारोती तेलंग, संजय तांबे, गजानन पाऊणकार याचेसह महिला बचत गटाच्या महिलां यांनी दिला आहे.