आल इंडिया आदिवासी इम्लायमेंट फेडरेशन पारशिवनी च्या वतीने आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचा भव्य सत्कार समारोह सपन्न.

कमलसिंह यादव 

     उपसंपादक

पारशिवनी :- पारशिवनी येथे आल इंडिया आदिवासी इम्लायमेंट फेडरेशन पारशिवनी च्या वतीने शनिवार सायंकाळी खापरखेडा रोड येथिल आदिवासी समाज च्या कार्यालयात शनिवार दिनांक ०८/०६/२०२४ रोजी सायंकाळी आदिवासी गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनी याचां विद्यार्थ्याने इयत्ता बारावी उत्तीर्ण होऊन समाजातील विद्यार्थ्यांमध्ये उच्च गुणवत्तेने उत्तीर्ण केले.

        त्याचप्रमाणे NEET परीक्षेत अधिक गुण मिळाल्याने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचा आल इंडिया आदिवासी इम्लायमेंट फेडरेशन तर्फे आयोजित आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारोह चे कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे हस्ते गोडंवाना गणतंत्र पार्टीचे नागपूर जिल्हा अध्यक्ष धनराज मडावी सर, प्राध्यापक विनोद पुरकाम सर, गोडंवाना गणतंत्र पार्टी, चे पारशिवनी ची अध्यक्षा श्वेता अरुण ढेकळे यांच्या हस्ते सन्मानित आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिले.

         या प्रसंगी आल इंडिया आदिवासी इम्लायमेंट फेडरेशन पारशिवनी चे उमा कोडवते, रविंद भलावी, राजु नरपाची, वंदना भलावी, अमित इरपाची सह आदिवासी समाजातील कार्यकर्ते सह सत्कार मुर्ती गुणवंत विद्यार्थी विद्यार्थीनी व सामाजिक नागरिक बहुसंख्येत उपस्थित होते .