अबोदनगो सुभाष चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दखल न्युज भारत
श्री.विशाल आनंद, पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा. यांनी अमरावती जिल्हयात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी करीता अवैदयशस्त्रे बाळगणा-या विरुध्द कार्यवाही करणेबाबतब आदेशित केल्यावरुण पोलिस निरीक्षक किरण वानखडे, स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रा. यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुण आवश्यक सुचना दिल्या होत्या.
त्त्या अनुषगांने स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणचे पथक गोपनिय माहीती घेत असता दि.०८/०६/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनिय माहीती मिळाली कि, दोन इसम घटांग ते परतवाडा रोडने मोटर सायकलवर अवैदयरित्या गावठी पिस्टल घेवून येणार आहेत.
अशा गोपनिय खबरेवरुण स्थागुशाचे पथकाने घटांग ते परतवाडा रोडवर सापळा लावला असता दोन इसम मिळालेल्या खबरेप्रमाणे संशयितरित्या घटांग कडुन परतवाडा कडे येतांना दिसले.
स्थाणुशा अमरावती ग्रा चे पथकाने सिताफीने त्यांना ताब्यात घेवुन त्यांची झडती घेतली असता दोन्ही आरोपींचे ताब्यातुन ०१ गावठी बनावटीचे मॅक्झीनसह पिस्टल, ०२ जिवंत काडतुस, एक खाली मॅक्झीन व ०३ मोबाईल फोन मिळुन आले.
सदर दोन्ही इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अनुक्रमे
०१) मोहम्मद रुबा मोहम्मद खलील वय ३० वर्ष रा. इतवारा बाजार, चारा गल्ली, अमरावती
२) मोहम्मद तौसीफ मोहम्मद सादिक वैय २३ वर्ष रा. धरम काटा, वलगाव रोड, अमरावती असे सांगितले.
त्यांना त्यांचे ताब्यातुन मिळुन आलेल्या गावठी बनावटीचे पिस्टलचे परवाना बाबत विचारणा केली असता त्यांनी कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. वरुण पंचासमक्ष दोन्ही आरोपीकडून ०१ गावठी बनावटीचे मॅक्झीनसह पिस्टल, ०२ जिवंत काडतुस, एक खाली मॅक्झीन व ०३ मोबाईल फोन व होन्डा युनिकॉर्न मोटर सायकल असा एकुण १४८,००० रुपयेचा माल जप्त करण्यात आला.
आरोपी यांनी सदर पिस्टल व काडतुस कोठून आणले व त्याचा वापर कशासाठी करणार होते? याचा तपास सुरु असुन सदर दोन्ही आरोपींनगा पुढील तपासकामी पोलिस स्टेशन परतवाडा यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई श्री.विशाल आनंद सो.पोलिस अधीक्षक, अमरावती प्रा.पंकज कुमावत सो.अपर पोलिस अधिक्षक, याचे मार्गदर्शनात श्री. किरण वानखडे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अम.ग्रा. यांचे नेतृत्वगत सह. पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रविंद्र व-हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने, चालक मंगेश मानमोडे यांनी केली.