डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
गडचिरोली,(जिमाका)दि.09: मान्सुन कालावधीत विशेषत: जुन व जुलै या महिन्यात विज पडुन जिवीतहानी होत असते. विज पडुन जिवित हानी होऊ नये या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी “दामिनी” ॲप तयार केले असुन सदरचे ॲप Google Play Store वर उपलब्ध आहे. करीता सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून आपले अधिनस्त तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी/ कर्मचारी , नागरिक, क्षेत्रिय अधिकारी/मंडळ अधिकारी, अव्वल कारकुन, महसुल सहाय्य्क, गाव स्तरावरील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी , ग्रामसेवक , कृषीसेवक , कोतवाल , आशा वर्कर, अंगणवाडी सेविका , आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एंन्ट्री ऑपरेटर यांना सदरचे ॲप डाऊनलोड करुन त्याचा वापर करणेबाबत प्रवृत्त करण्यात यावे . तसेच सदरचे ॲप GPS लोकेशन ने काम करीत असून विज पडण्याच्या 15 मिनिटापूर्वी सदरच्या ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते.
आपलेॲप मध्ये सभोवताल विज पडत असल्यास सदरचे ठिकाणापासून सुरक्षीत स्थळी जावे तसेच सदर वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये याबाबतचे त्यांना निर्देश देण्यात यावे. तसेच इतर सामान्य् नागरीक यांना हे ॲप डाऊनलोड करण्यास नागरिकांनी प्रवृत्त करावे.
गावातील सर्व स्थानिक शासकीय, अधिकारी/ कर्मचारी यांना सदर App Download करुन त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या Alert नुसार आवश्यक पूर्वसुचना गावातील सर्व नागरीकांना देऊन होणारी जिवितहानी टाळण्याच्या प्रय्तन करावे असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली यांनी कळविले आहे.