संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा कार्यक्रम जाहीर… — रविवार दुपारी चारच्या सुमारास माऊलींची पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान…

दिनेश कुऱ्हाडे 

 उपसंपादक

आळंदी : येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा कार्यक्रम जाहीर झाला असून रविवार दि.११ जून रोजी दुपारी चारच्या सुमारास माऊलींची पालखी हरी नामाचा गजर करीत पंढरपुराकडे प्रस्थान ठेवणार आहे असे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई आणि पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील यांनी सांगितले आहे.

      संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी पहाटे ४ पासून पहाटे ५:३० पर्यंत घंटानाद, काकडा, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दुधारती हे विधीवत कार्यक्रम संपन्न होतील, ५:३० ते सकाळी ९ वाजेपर्यंत श्रींच्या चलपादूकांवर भाविक भक्तांच्या महापुजा होतील, सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत भाविकांना श्रींचे समाधी स्पर्श दर्शन होईल, सकाळी नऊ ते अकरा यावेळत परंपरेनुसार किर्तन सेवा संपन्न होणार आहे, दु.१२ ते दु.१२:३० यावेळी गाभारा स्वच्छ, समाधीस पाणी घालणे, श्रींना महानैवेद्य दाखविला जाईल, दु.१२ ते दु.१ दरम्यान भाविकांना श्रींचे दर्शन घेता येईल.

      दुपारी १:३० ते दु.२ वाजता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी महाद्वारातून ४७ दिंड्यांना मंदिरात प्रवेश दिला जाईल, दुपारी चारच्या सुमारास परंपरेनुसार श्री गुरु हैबतबाबा यांच्या वतीने व संस्थांनतर्फे श्रींची आरती होऊन प्रमुख मानकऱ्यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात येणार आहे, वीणा मंडपात फुलांनी सजवलेल्या पालखीत श्रींच्या पादुकां प्राणप्रतिष्ठापित केल्या जाईल, नंतर संस्थांनतर्फे मानकऱ्यांना मानाचे पागोटे वाटप केले जातील, तद्नंतर श्री गुरु हैबतबाबा यांच्या वतीने दिंडी प्रमुख, प्रतिष्ठीत मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात येतील, नंतर आळंदीकर ग्रामस्थ पालखी खांद्यावर घेऊन पालखीचे वीणा मंडपातून मंदिर प्रदक्षिणा करुण महाद्वारातून श्रींची पालखी बाहेर पडले, महाद्वारातून पालखी पितळी गणपती मार्ग वरून, प्रदक्षिणा रोड, भैरवनाथ चौक, हजेरी मारुती मंदिर, चावडी चौक, महाद्वार चौकातून दर्शन मंडपात समाज आरती संपन्न होऊन पहिल्या मुक्कामासाठी थांबली जाणार आहे.यावेळी मंदिरात, महाद्वार चौकात आणि प्रदक्षिणा मार्गावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.