श्री ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज मध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिन साजरा करण्यात आला.

          या निमित्ताने श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांच्या पत्नी मंजुश्री वडगावकर, प्रसिद्ध निवेदिका स्वप्ना भुजबळ, विद्यालयातील पर्यवेक्षिका अनिता पडळकर, अनुजायिनी राजहंस, जेष्ठ लिपिका संगीता पाटील, शिक्षिका हेमांगी उपरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.

         महिला शिक्षिकांसाठी खेळ रंगला मनोरंजनाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी तालुक्यातील प्रसिद्ध निवेदक कैलास दुधाळे तसेच प्रसिद्घ निवेदिका स्वप्ना भुजबळ यांनी सदर कार्यक्रमाचे निवेदन केले. 

          सुनिती ज्वेलर्स यांच्या वतीने सर्व महिला शिक्षिकांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. सर्व महिला शिक्षिकांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. महिला दिनाच्या निमित्ताने संस्थेचे सचिव अजित वडगावकर, विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदिप काळे, उपप्राचार्य किसनसिंग राठोड आदींनी सर्व शिक्षिकांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर शितल बागडे यांनी सर्वांचे आभार मानले.

         प्राचार्य सूर्यकांत मुंगसे यांच्या संकल्पनेतून आगळ्या वेगळ्या महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.