महाराष्ट्र मल्हारसेना चंद्रपूर व महाराष्ट्र धनगर समाज महासंघ चंद्रपूर वतीने शुभम लहाने यांचा सत्कार… 

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी 

चिमूर :- शंकरपूर येथील शुभम लहाने यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे प्रयोगशाळा सहाय्यक पदी नुकतीच निवड झाली.

          धनगर भटक्या जमाती मध्ये असुनही शिक्षणाचे प्रमाण अल्प असले तरी शुभम लहाने यांचे शिक्षण सावरी (गोंदीया) येथे झाले असले तरी वैद्यकीय क्षेत्रात आवड असल्याने वैद्यकीय क्षेत्रात विविध कोर्स मधुन सुद्धा आपल्याला आपले आवडीचे क्षेत्र मिळविण्यासाठी नागपूर येथे शिक्षण घेतले.

         कठोर परिश्रम जिद्द चिकाटीच्या बलावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चंद्रपूर येथे प्रयोगशाळा सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे परिसरात सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

          शुभम लहाने यांच्या सत्कार प्रसंगी माजी प्रदेशाध्यक्ष अशोक शेळके,शुभम मंडपे,दीपक उघडे मल्हारसेना उपाध्यक्ष चंद्रपूर,श्रीकांत शेरकी,प्रफुल खोब्रागडे,लक्ष्मण शेरकी,यशवंत तुरारे,सतीश कोल्हे,सुचित लहाने,आदींची उपस्थित होते.