
“आमच्या देशाला विचारवंतांची कमी अजिबात नाही.परंतू आचारवंताचे ‘ बी ‘ सुद्धा नाही…
माईक हातात घेतला की तो सोडण्याचा मोह संपत नाही.बेंबीचे देठ तुटेल,माईक गरम होईल,वेळेचं भान सुद्धा राहात नाही, सूत्रसंचालकाकडून आलेल्या चिठ्या हवेतच उडून जातील,पाणि पिऊ पिऊ थकून जाईल. लोकं कंटाळतील,परंतू थकत नाही.अशांचा भरणा असलेला आमचा देश.सर्व डिग्र्या याने यासाठीच घेतल्या जणू. बरं हे सगळं बोलणं इतरांसाठी कांहीतरी करण्यासाठी.स्वतःची मात्र कर्तव्यातून सुट्टी!
अशांच्या भरवशावर महापुरुषांनी क्रांतीचे ओझे टाकले.असा यांचा गैरसमज. कार्यकाळात लाखो रुपये पगारी,हजारो रुपये पेन्शन परंतू खात्यावर मानधन आल्याशिवाय, जाण्यायेण्याचे तिकीट काढून दिल्याशिवाय,हा पठ्ठ्या बोंबलण्यासाठी तयारच होत नाही.
बरं जे कुणी कधीच ऐकलं नसेल ते तरी सांगावं ना!
तेही नाही,आपलं जे नेहमीच गुऱ्हाळ आहे तेच ते पुन्हा,पुन्हा.असे बोलणारे थांबता थांबत नाहीत.तर दुसरीकडे जे खरोखर विचार करतात,ते बोलत नाहीत.अशा दोन प्रकारच्या खोट्या विद्वानात आमचा देश अडकलाय…..
देशाला,राज्याला,समाजाला वाचविण्यासाठी केवळ…
संत गाडगेबाबा यांच्याच आदर्शाने निर्माण झालेली.विनाभिंतीच्या शाळेतून, महाविद्यालयातून,विद्यापीठातून डॉक्टरांच्या डॉक्टरांची पदवी घेतलेल्या सर्वसामान्य युवापिढीचीच आवश्यकता आहे….
वैचारिक आणि आचारिक क्रांती यशस्वी करण्यासाठी महापुरुषांनी अवघडाला सोपे करुन सांगितले.परंतू या नकली विद्वानांनी सोप्याचे अवघड करुन सांगितल्यामुळे अज्ञानी समाजात यांची पत राहते.म्हणून यांचा असा आटापिटा चालत आला आहे..
यांचे पीक महापुरुषांच्या जयंती,स्मृतिदिन या काळात फार जोमात येते.
परंतू ,ही मंडळी गाडगेबाबा यांच्या क्रांतिकडे का लक्ष देत नाहीत?
संत गाडगेबाबा एखाद्याच्या घरी पाणि मागायचे तर,अगोदर त्याचे अंगण आणि समोरचा रस्ता साफ करायचे…
त्याची लाकडे फोडायचे तेंव्हा भाकर मागायचे.चावडीपुढे जाऊन चावडी आणि सभोवतालचा परिसर स्वच्छ करायचे.जर कुणी विचारलं की, काऊन झाडतं रे बाप्पा? तर सांगायचे आज रात्री महाराजाचे कीर्तन होणार हाये ओ माई म्हणून सांगायचे.
रात्रीचा अंधार चिरत शांततेचा भंग करणारा आवाज….
“गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला”
दिवसभर शेतात राबून दगडी निद्रेच्या झोपण्याच्या तयारीत असणाऱ्या बाया,बापड्यांचा जमाव एकेक करत चावडीच्या दिशेने यावा.चावडी गच्च भरावी.अन मग आपल्या भजनात दंग असलेल्या बाबांनी डोळे उघडावे आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवादरुपी कीर्तन पहाटेपर्यंत चालत असे.अंधश्रद्धा,बुवाबाजी,व्यसनाधिनता,हुंडापद्धती, शिक्षणाचे महत्व, स्त्री – पुरुष समानता,धार्मिक कर्मकांड, जत्रेत होणाऱ्या नवसाने हकनाक जाणारा मुक्या बकऱ्या कोंबड्याचा बळी,विज्ञानवादी बनण्यासाठीचे सारे उपाय त्या कीर्तनाचे विषय असत…..
आणि मग बाबांची स्वारी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावात मुक्कामी.असे जीवन पूर्ण जीवनभर जगले…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
हे त्यांचे आदर्श होते.बाबासाहेबांच्या महापरीनिर्वणानंतर त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला,शेवटी चौदा दिवसानंतर त्यांचेही निर्वाण झाले!
अशा संत गाडगेबाबा यांचा आदर्श आपण प्रत्येक भारतीय नागरिक या नात्याने आचरणातून सिद्ध करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. येथील मानवताविरोधी,विज्ञानविरोधी, वीवेकविरोधी अर्थात संविधानविरोधी शक्ती……
“डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारताचे संविधान,संपविण्यासाठी सर्वतोपारी प्रयत्न करत आहे.त्या शक्तीच्या विरोधात बोलून कृती करण्यासाठी,रस्त्यावर एकजुटीने उतरण्याची वेळ लवकरच येणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने तन – मन – धनाने समर्पित होण्यासाठी सज्ज राहावे….
संविधान जागृतीतून कृती हीच खरी देशाची प्रगती..
म्हणून आता म.फुले यांच्या शब्दात आपण बोलके सुधारक होण्यापेक्षा कर्ते सूधारक होऊया…
आणि म्हणून,जर विचार करणारे बोलून कृती करू लागले तर निश्चितच राक्षसी लोकांचे फावणार नाही…
हाच एकमेव उपाय आहे..
जागृतीचा कृतिशील लेखक आणि आवाहनकर्ता..
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,रेणापूरकर,औरंगाबाद 7875452689…