युवराज डोंगरे
खल्लार/प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयाच्या महिला विकास समितीच्या वतीने व इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रवींद्र इचे, डॉ. आशिष काळे, तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. भारत कल्याणकर उपस्थित होते. देशाच्या आर्थिक विकासामध्ये महिलांचे योगदान महत्वपूर्ण आहे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया ह्या पुरुषांच्या बरोबरीने आपले काम सक्षमपणे करत आहेत. असे प्रतिपादन डॉ. रवींद्र इचे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. आशिष काळे तर या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून डॉ. प्रवीण सदार उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला विषयक आपले विचार व्यक्त केले . या कार्यक्रमाचे आभार विवेक धाकडे यांनी मानले.