RSS च्या कृत्रिम प्रवाहात बुडून संपत असतांना थांबा…….. — स्वातंत्र्यात जगायचे असल्यास ईव्हीएम हटविणे आवश्यक.. — महत्वपूर्ण,”एकदा वेळ काढून वाचाच..

 — पहा…….

  — विचार करा…..

 — कृती करा…….

 — नसेल नेभळट होऊन षंढ बना…..

 — आणि गुलामीत संपून जा…..

 — एवढीच नपूंसक औलाद आम्ही…..?

— स्वतःला फुले, शाहू, आंबेडकरांचे वैचारिक वारसदार समजून चार भिंतीच्या आतच, मर्यादित लोकात, त्याच त्याच लोकात त्यांची काने पकविणारे आम्ही षंढ लेकरं महापुरुषांची…….?

 थू………

 आमच्या ( यामध्ये अनंत भवरे प्रथम ) जिंदगाणीवर…….

***

     आमच्या भारत देशाच्या मूळ सिंधू संस्कृतीवर ( 100% लोकशाहीवादी आणि प्रयोगातून अस्तित्वात असलेल्या ) घाला घालणारी ही कूटनितीची साडेतीन टक्के बाहेरून आलेली बामण जात साम, दाम, दंड आणि भेदाच्या कूट नितीच्या साहाय्याने 96 % लोकांना गुलाम बनवते…….

      यांचा विरोध एकटे भ. बुद्ध., एकटे संत कबीर, एकटे म. फुले, एकटे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एकटे कांशीरामजी, एकटे व्ही. पी. सिंग, अपापल्या विद्वतेच्या, कौशल्याच्या बळावर त्या त्या काळात 100% प्रतिकूल परिस्थितीत करू शकतात……!

        आणि आम्ही ( त्यांची षंढ लेकरं ) त्यांच्या त्या क्रांत्यांचा प्रवाह जो विज्ञानवादी + विवेकवादी =मानवतावादी होता तो प्रवाह कधीही 96%टक्के लोकांपर्यंत विविध उच्चं कोटीची तंत्रज्ञान असतांना 2024 च्या काळात सुद्धा परिणामकारक पद्धतीने पोहचवू शकलो नाही……

पोहचवू शकत नाही……

पोहचवू शकणार का नाही ते सांगता येणार नाही…..

    याचा अर्थ स्पष्ट आहे की आम्ही खऱ्या महापुरुषांची लेकरं असूच शकत नाही…

      “कारण…

     आम्ही महापुरुषांना आणि त्यांच्या क्रांत्यांना सार्वजनिक ठिकाणी पुतळ्यात आणि स्मारकात बंदिस्त करून टाकले तसेच घरामध्ये प्रतिमेत …….

      केवळ त्यांच्या जयंती आणि स्मृती दिनानिमित्त त्यांना थोडेसे केवळ ओठातूनच पोटातले पाणीही न हलू देता बाहेर काढण्याचे ढोंग आम्ही जरूर करतो……

        त्यांच्या वेगवेगळ्या क्रांतीतून निर्माण झालेल्या चार दिवसाच्या सुखामुळे आम्ही एवढे हुरळून गेलो की,शिक्षणाच्या सवलतीमुळे आलेल्या अहंकाराच्या खोट्या विद्वत्तेतून सर्वकाही फुकट मिळाल्यामुळे आम्ही छोटी छोटी डबकीच निर्माण करू शकलो…….

         ही अवस्था शैक्षणिक,सामाजिक,राजकीय, धार्मिक इत्यादी सर्वच क्षेत्रात आम्ही निर्माण केल्यामुळेच आम्ही साढे तीन टक्क्यांचे गुलाम बनण्याच्या मार्गात अलगद येऊन सापडलो…..!

              आणि आता 2024 च्या काळात अशाकाही मनुवाद्याच्या पिंजऱ्यात आम्ही सापडलो की, काहीही करून आता आमची सुटका नाही……

 नाही…..

नाही…..

धरणच फुटलंय,बांध कुठे घालायचा…..?

आभाळच फाटलंय ठीगळ कुठं कुठं लावायचं…..?

   ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ही गुलामी कधीच या देशातच काय संपूर्ण विश्वात येऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचे संविधान निर्माण करून देशाला प्रदान केले. त्याला कधी आम्ही पहिल्या पानाच्या नंतर कधी दुसरे पान उघडण्याचा प्रयत्न केलाच नाही(सर्व फुकट मिळाल्यामुळे ).

         केवळ राज्यकर्त्यांनाच दोष 100% टक्के देऊन चालणार नाही, तर ज्यांची ही जबाबदारी होती ती म्हणजे, वकील, न्यायाधीश, डॉक्टरेट प्राध्यापक,स्वतःला सुशिक्षित समजणारे विद्वान,

      यांनी शिक्षणाच्या एकाच धारेचा वापर केला, गडगंज संपत्ती कमविली( अनितीच्या मार्गाने ), त्याला शिलाची जोडच नव्हती म्हणून स्वतःचे मरण स्वतःच्या डोळ्यांनी आता पाहत आहेत………..

     परंतू ,या सर्वामध्ये सर्वसामान्य जनतेचा काय दोष…?

      आता मात्र किंतु, परंतू, जर, तर, कोण दोषी, कोण खरे, कोण खोटे, कोण बरोबर या शंका जगाच्या वेशीवर टांगाव्या लागतील. खोट्या सुशिक्षितांनी घेतलेल्या अहंकाराच्या अनितीच्या मार्गाने आलेल्या पैशातून पांघरून घेतलेल्या शालीला आता काढून फेकून द्या……..!

        कोणत्याच राजकारण्यांकडून अपेक्षा न करता,स्वतः भारतीय जनतेने ( 96%) राजकारणाच्या, धर्माच्या, जातीच्या भिंती भेदून मानवता धर्माच्या दिशेने संविधानाच्या रक्षणासाठी एक पाऊल (स्वतःच्या धर्माच्या कट्टरतेतून बाहेर पडून ) पुढे टाकूया…..

     “कारण……

      आजचे संविधान, लोकशाही, देश, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या सर्व संकल्पना ICU मधून आपल्याला खुणावतात की आम्हाला वाचवा, अन्यथा आमच्या बरोबर तुम्ही सुद्धा……

        भारतीय लोकशाहीचे चारही आधारस्तंभ राष्ट्रपती + संसद म्हणजे कायदेमंडळ,कार्यकारी मंडळ म्हणजे सरकार,न्यायमंडळ म्हणजे सरन्यायाधीश ( सर्वोच्च न्यायालय ), पत्रकारिता म्हणजे ( गोदीमीडिया ), या सर्व लोकशाहीच्या संस्था साढेतीन टक्क्यानी आपल्या ताब्यात घेतल्यामुळे आम्ही (96% भारतीय जनता ) 2024 च्या उगवत्या सूर्यापासून कोरोनाच्या गतीने गुलामीच्या दिशेने धावत आहोत…

     वरील सर्वच क्षेत्रातील मानसिक गुलामी जर टाळायची असेल तर सध्या तरी एक आणि एकच आपल्या हातात असलेला उपाय जर कोणता असेल तर, तो म्हणजे काहीही करून लोकसभेच्या निवडणुका EVM+ VVPAT वर न घेऊ देता बॅलेट पेपरवरच घेतल्या पाहिजेत यासाठी वाटेल तो त्याग आणि संघर्ष करणेहेच आपल्या हातात आहे.

          जेंव्हा मी औरंगाबाद येथे EVM +VVPAT च्या विरोधात आमरण उपोषणाला बसलो त्याच्या तिसऱ्याच दिवसापासून निवडणूक आयोगाने संपूर्ण देशात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत EVM+ VVPAT कशी पारदर्शक आहे ते प्रात्यक्षिक दाखविण्यास सुरुवात केली…..

       अरे एखाद्या मुलाला मुलगी पसंद आहे, पण मुलीला मुलगा पसंदच नाही ना?तुम्ही मुलाला मोठी नोकरी आहे,गडगन्ज संपत्ती आहे, एकुलता एकच आहे, बंगला गाड्या आहेत, उच्चं शिक्षित आहे………

        परंतू त्याच्यात चारित्र्यच नाही हे त्या मुलीला माहित आहे ना…..!

      मग तुमचा अट्टाहास का….?

        अगदी याप्रमाणेच भारतीय जनतेचाच काय संपूर्ण जगाचा विश्वास या EVM + VVPAT वर नाही तर तुमचा ( मुख्य निवडणूक आयोगाचा ) अट्टाहास आमच्या लादण्याचा का……?

              म्हणूनच……

आता EVM + VVPAT हटाव बॅलेट पेपर लाव रस्त्यावर उतरून जनजागृतीसाठीच……

  संविधान जनजागरण महाराष्ट्रभर रॅलीचे आयोजन लवकरच आम्ही आपल्या भेटीला…… 

    त्यासाठी तुमच्या तन -मन -धनाची अपेक्षा आम्हाला, आणि EVM+ VVPAT हटविण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही कटीबद्ध……

***

आवाहनकर्ते :-

 अनंत केरबाजी भवरे

 ( संविधान विश्लेषक, औरंगाबाद,रेणापूरकर, 7875452689 )

            आणि

     चंद्रमणी गाडेकर

 ( संविधान प्रचारक,जालना, 90967246000 )