कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:- तालुक्यातिल साटक येथे जागतिक महिला दिना निमिताने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत सक्षम महिला ग्रामसंघ साटक व ग्राम पंचायत साटक यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा पटागण साटक येथे महिला जागतिक दिवस आनंदाने उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी साटक गावचे प्रथम नागरिक सन्माननीय श्री. तरुणकुमारजी बर्वे कार्यक्रमाचे अध्यक्ष, श्री.रविंद्रजी गुडधे उपसरपंच ग्रामपंचायत साटक प्रमुख पाहुणे,कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख वक्ते म्हणून कढोली गावच्या माजी सरपंचा सौ. प्रांजलीताई वाघ,श्री. आशिषजी देशमुख,श्री. काशिरामजी छानिकार, सौ. राधाताई हिंग,सौ. मीनाक्षीताई भुते,श्रीमती ललिताबाई चामट,सौ. मालतीबाई तांडेकर,सौ. रेखाबाई हटवार माजी सरपंच ग्रामपंचायत साटक,सौ. शोभाबाई वांढरे उपस्थित होते.
जागतिक महीला दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सुनीताताई बागडे,आणि सौ. करुणाताई बिरो यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. पुष्पाबाई गाऊत्रे यांनी केले.त्यानंतर कार्यक्रमाचे आभार सौ. मिनाक्षीताई भुते यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली.