
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
जन्माला आलेल्या प्रत्येकाला समाजाचा देणं असतं. ज्या समाजाने आपल्याला ओळख दिली त्या समाजाप्रती समर्पित भावना ठेवून आपल्या कुटुंबासह आपल्या समाजाची प्रगती साधने हेतू रोजगाराच्या मागे न धावता स्वयंभूपणे उभे होऊन उद्योजक बना व समाजातील इतर बांधवांना रोजगार देऊन आपल्या समाजाचा रोजगाराभिमुख विकास करा. असे प्रतिपादन राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजयवाडा यांनी केले.
ते सिंदेवाही येथे नगर तेली समाजाच्या वतीने आयोजित संत शिरोमणी श्री.जगनाडे महाराज जयंती महोत्सव तथा समाज प्रबोधन व सत्कार सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
आयोजित सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून विदर्भ तेली समाज महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष रघुनाथजी शेंडे, प्रमुख अतिथी म्हणून किशोर वरभे, डॉ.संजय बेले, विलास काळे, प्रशांत उराडे, अतुल कामडी, डॉ.माधव वरभे, डॉ.केशव शेंडे, किशोर पिसे, स्वप्नील कावळे, किशोर भरडकर, सत्कारमूर्ती शेतकरी राणी वर्षा लांजेवार, विनायक घुग्गुस्कर, योगराज कावळे, भैय्याजी नागोसे, डॉ. रक्षा बोडणे, आशा गंडाटे दिलीप तिजारे, भूपेश लाखे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी विरोधी पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशाच्या चारही दिशा तेली समाजाचे व्यापक साम्राज्य आहे. अशा विशाल समाजाला जगद्गुरु तुकारामांचे विश्वासू शिक्षित असे संत शिरोमणी संत जगनाडे महाराज यांचा वारसा लाभला आहे. तुकोबारायांच्या गाथा ज्या संत जगनाडे महाराजांनी लिहिल्या त्या गाथा मिटविण्यासाठी थोटांड शक्तीने कटकारस्थान रचले.
मात्र संतांच्या या पावन महाराष्ट्र भूमीत जी शिकवण संतांनी येथील समाजाला दिली ती समाजाला दिशा दाखविणारी असून आपल्या समाजाला जर सर्वांगीण विकासाच्या उच्च स्तरवर न्यायचा असेल तर स्वतःशिक्षित होऊन उद्योजक बना व इतर बांधवांना शिक्षणाकरिता व सामर्थ्यवान होण्यकरिता हवे ते सहकार्य करून त्यांच्या हाताला काम द्या यातून समाजाचा सर्वांगीण विकास निश्चितपणे होऊ शकतो असेही ते यावेळी म्हणाले. तत्पूर्वी श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या पालखीची संपूर्ण सिंदेवाही शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यानंतर उपस्थित मान्यवरांनी समाज संघटन समाजाची प्रगती व समाजाला वैज्ञानिक व आधुनिक युगातील स्पर्धा, नेतृत्व व समाजाचा सर्वांगीण विकास याविषयी मुलाचे मार्गदर्शन केले.
आयोजित कार्यक्रमात सत्कारमूर्ती राज्याची माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार व शेतकरी राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्षाला निवड यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या उत्तारधार्थ तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तर चिमुकल्यांनी मनमोहक असे नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर कावळे यांनी, प्रास्तविक विनायक घुग्गुसकर तर आभार गणेश आसेकर यांनी मानले. आयोजित कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने तेली बांधव व भगिनी उपस्थित होते.