
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
आजाद समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ.जे.बी.रामटेके यांनी अँड.मिलींद महादेव मेश्राम यांची चंद्रपूर जिल्हा महासचिव पदी नियुक्ती केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज,राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संकल्पनेतील भारत तयार करण्यासाठी आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,मान्यवर कांशीराम यांच्या,”बहुजन हिताय बहुजन सुखाय,अंतर्गत समानतेची विचारधारा पुढे नेण्यासाठी,”आजाद समाज पार्टी (कांशीराम)चे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.चंद्रशेखर आजाद यांच्या सुचनेनुसार तसेच महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली अँड.मिलींद मेश्राम यांची चंद्रपूर जिल्हा महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अँड.मिलींद मेश्राम यांची आजाद समाज पार्टी चंद्रपूर जिल्हा महासचिव पदी नियुक्ती झाल्याने अनेक मित्रमंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.