
उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक..
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
दि.4 फेब्रुवारी 2025 ला चिमूर येथे अवैध रेतीचे चार हायवा चिमूर उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार चिमूर यांनी पकडून कार्यवाही केली होती.
हायवा क्र. MH-27 BX1639, MH-36 AA 2833, MH-40 BG 0590 व इतर एक हायवा असे एकून 4 हायवा तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालय चिमूर येथे जमा करण्यात आले होते.
जमा करण्यात आलेल्या ट्रक बाबत स्थानिक प्रसार माध्यम प्रतिनिधीनी माहीती विचारली असता दोन हायवाच्या चार ब्रास रायल्टीची माहिती देण्यात आली. मात्र चारही हायवामध्ये 6 ब्रास रेती होती असे दिसून आले व उर्वरित दोन हायवांची माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आला.
भल्या पहाटेच्या सुमारास चारही हायवा तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालयातून सोडून देण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे चंद्रपूर जिल्हा युवा अध्यक्ष शुभम मंडपे यांनी निवेदनाद्वारे केला आहे.
सदर कारवाही सकाळीच झाली असल्याने यात स्थानिक प्रशासनावर शंका आहे.या सर्व प्रकारची निष्पक्ष सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष शुभम मंडपे यांनी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
अवैध रेतीच्या चारही हायवा मध्ये किती ब्रास रेती होती व चारही हायवांची रॉयल्टी किती ब्रासची होती,चारही हायवांची अवैध रेतीचा साठा कुठे जमा केला याची सर्व चौकशी करण्यात यावी व काही त्रुटी आढळल्यास संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर कारवाही करण्यात यावी अशी मागणी रेटून धरण्यात आली आहे.
तहसील कार्यालयातील परिसरात शासकीय कामासाठी अवैध रेतीची साठवून केली आहे.याचबरोबर चिमूर तालुक्यातील सर्व शासकीय कामावर अवैध रेतीचा साठा आढळून येत आहे.
संपूर्ण चिमूर तालुक्यात अवैध रेतीचा उपसा केला जात असल्याने सदर सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी याबाबत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देऊन करण्यात आले आहे.
निवेदनाची प्रतिलिपी मुख्यमंत्री,उपमुख्यामंत्री,महसूलमंत्री,पालकमंत्री व चिमुर विधानसभेचे आमदार यांनाही पाठविणात आली आहे.
या प्रकरणाची तात्काळ चौकशी न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर समोर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला.