चिमूर तालुक्यात अपघाताचे प्रमाण वाढले?…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक

      मागील काही महिन्याचा आढावा घेतला तर चिमूर तालुक्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते आहे.

           अपघाता मागचे कारण शोधले तर अनियंत्रित वाहणे चालविणे हा मुद्दा पुढे आला आहे.याचबरोबर अवैध वाळू उपसा प्रकरणाकडे होणारे दुर्लक्ष आहे.

          सध्यास्थितीत चिमूर तालुक्यात अवैध व्यवसायाचे अनेक प्रकार सुरू असल्याने त्याही दृष्टीने अपघात होऊ शकतात याकडे कानाडोळा करता येत नाही.

         तद्वतच रस्त्यांचे बांधकाम बरोबर न होताही कंत्राटदाराला बिले अदा करणे हा सुद्धा अपघाताचा भाग आहे.