अबोदनगो चव्हाण
चिखलदरा तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
चिखलदरा :- सविस्तर वृत्त असे की चिखलदरा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटकुभ या शाळेने इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन केले.
जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक नामदेव अमोदे राजु मावस्कर चावरे मडम घायर मडम वाठवे मडम जिल्हा परिषद च्या मॕडम ,सर्व विध्यार्थी ,अंगणवाडी शिक्षिका बिस्मिल्ला मॅडम मदतीस मिना सर्व विध्यार्थी यांनी मोलाचे मार्गदर्शन करून हा आनंद नगरीचा उपक्रम काटकुंभ जी.प. शाळा येथे आनंदात पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता सरस्वती देवी प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने जे पदार्थ बनवलेले होते ते व्यवस्थित रित्या मांडणी करून आपापला स्टॉल लावण्यात आला.
स्टॉलमध्ये सर्वांना आवडते पदार्थ आणले गेले. उदाहरणार्थ :- वडापाव, भेळ ,इडली, डोसा, भजे ,चिवडा वटाने पोंगे ,गुलाब जामुन तसेच फळे देखील द्राक्ष, केळी ,सफरचंद ,मोसंबी ,अशा प्रकारचे फळे विक्रीसाठी आणलेले होते. गावातील प्रतिष्ठित नागरिक ,आजी माजी पदाधिकारी ,तरुण मित्र मंडळ, पत्रकार अबोदनगो चव्हाण ओमप्रकाश राजेंद्र यश पंकज बाजीलाल संतोष सुखदेव बांधव ,यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
तसेच काटकुंभ जी. प. चे येथील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षक वृंद यांनी आनंदनगरीमध्ये खरेदीसाठी सहभाग घेतला. बनवलेल्या पदार्थापैकी आवडते पदार्थ विक्री करून स्वाद घेतला ज्याप्रमाणे बाजारामध्ये जातो त्या ठिकाणी लावलेले स्टॉल आपापला पदार्थ विक्रीचे काम करतात त्याच घाईने कस्टमर देखील खरेदी करण्यामध्ये मग्न होतात तशी परिस्थिती या चिमुकल्यांच्या सहवासातील हा आनंद नगरीचा उपक्रम उत्कृष्ट ठरला.