रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमूर:-
घनदाट जंगलात वसलेल्या मुरपार गावात गट ग्रामपंचायत कार्यालय आहे.या ग्रामपंचायत अंतर्गत २६ जानेवारी निमित्ताने ग्रामसभा घेण्यात आली नाही आणि अजूनही ग्रामसभा घेण्यात आली नाही.
सरपंच व सचिव यांनी ग्रामसभा न घेता नागरिकांच्या मुलभूत अधिकारांना डावलण्याच्या प्रकार केला आहे.यामुळे सरपंच व ग्रामसेवकांनी शासनाच्या लोकहितार्थ धोरणाला बघल दिली आहे.
ग्रामसभा न घेण्यासंबंधाने समस्त मुरपार (तु.) वासियांनी गटविकास अधिकारी चिमूर यांच्याकडे सरपंच व ग्रामसेवकांची तक्रार केली आहे आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
गटविकास अधिकाऱ्यांच्या अनुपस्थित सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचे निवेदन विस्तार अधिकारी ए.के.शामकुळे यांना दिले आहे.