युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
नजिकच्या मार्कंडा येथिल महात्मा फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परिक्षेत सुयश मिळविले आहे.
दि.१० डिसेंबर २०२३ ला प्रबोधन विद्यालय, दर्यापूर येथे झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परिक्षेत महात्मा फुले विद्यालय, मार्कंडा येथील वर्ग – ८ मधिल कु. ऋतुजा संतोष अवघड, कु. सलोनी श्रीकृष्ण वाघमारे, आदित्य प्रमोद सुरवाडे,अर्जुन पुरुषोत्तम चवरे या विद्यार्थीनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत परिक्षेत उत्तुंग भरारी घेत सुयश पटकाविले आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक यांना दिले असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.