कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
कन्हान :- कन्हान – पिपरी येथील समस्त नागरिकांच्या वतीने केंद्र सरकार,निवडणूक आयोगाच्या विरोधात व ईव्हीएम हटावो,देश बचाओ,जन जागृती जनआंदोलन करण्यात आले.
कन्हान पोलीस स्टेशन जवळील गांधी चौक येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन विनम्र अभिवादन करीत जनजागृति रैली काढण्यात आली.
केंद्र सरकार आणि चुनाव आयोगाचा विरोधात काढण्यात आलेल्या रैली मध्ये नागरिकांनी,”ईव्हीएम हटावो,देश बचाओ,..”ईव्हीएम मशीन हटाना है, बैलेट पेपर लाना है,..” गली गली में शोर है ईव्हीएम मशीन चोर है,…”ईव्हीएम हटावो,संविधान बचाओ,…” ईव्हीएम मशीन धोका है, लाथ मारो मोका है,..अशा नावाचे हातात पोस्टर,फलक घेऊन घोषणा देत आणि चुनाव आयोगाचा विरोधात जोरदार निर्दशने केलीत.
रैली राष्ट्रीय महामार्गाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोहचली असता नागरिकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
त्यानंतर रैली शहरातील महामार्गा ने तारसा चौक,सात नंबर नाका,गहुहिवरा चौक,सह आदि विविध मार्गाने भ्रमण करुन रैलीचे गांधी चौक येथे समापन करण्यात आले.
इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम राष्ट्रीय समन्वयक अधिवक्ता सौ.एड.स्मिता कांबले,अधिवक्ता विश्वजीत वानखेडे,प्रवीण तायडे यांनी नागरिकांना मार्गदर्शन करुन ईव्हीएम हटावो,देश बचाओ या जन जागृती,जनआंदोलनात जास्तीत जास्त नागरिकांनी सहकार्य करावे असे कडकडीचे आवाहन केले आहे.
या प्रसंगी अजय चव्हाण,अकरम कुरैशी,शाहिद रजा,पंकज रामटेके,अश्वमेघ पाटील,संदीप शेंडे,नितिन मेश्राम,गणेश भालेकर , नेवालाल पात्रे,रंजनिश मेश्राम,अखिलेश मेश्राम,नितेश मेश्राम,अभिजीत चांदुरकर,चिराल वैद्य,धीरज गजभिए,संगीत भारती,शाहरुख खान,प्रियांशु वाघमारे,रितीक कापसे,शाहिल रामटेके,ऋषभ खोब्रागडे,चेतन मेश्राम,मनोज गोंडाने,श्रीकांत वाघमारे,भारत जांभुळकर,रवि कुर्वे,विक्रांत मेश्राम,हर्षराम मेश्राम सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.