घटना स्थळावर तिन महिला मजूरांचा मृत्यू,अनेक महिला गंभीर,नागपूरला उपचार सुरु,गावात शोककळा… — डॉ.सतिश वारजूकर गेले मदतीला धावून.. — साश्रुनयनांनी होणार अंत्यविधी.‌

प्रदीप रामटेके

मुख्य संपादक 

नागपूर : – 

          ब्रम्हपुरी तालुका अतंर्गत मौजा माहेर (खरबी) गावातील महिला मजूर वर्धा जिल्हातंर्गत समद्रपूर तालुक्यातील मौजा शिर्सी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील कामावर दररोज यायच्या.दिवसभर शेतातील काम करुन सायंकाळच्या वेळी गावाकडे परतीचा प्रवास करीत असतात शिर्सी ते उमरेड मार्गावर टेम्पो उलटून जोरदार अपघात झाला.

        सदर अपघात शिर्सी पासून ३ किलोमीटर अंतरावर काल सायंकाळच्या वेळी परतीच्या प्रवासा अतंर्गत झाला असून घटना स्थळावर जागीच ३ महिला मजूरांचा मृत्यू झाला व बाकीच्या १४ महिला गंभीर जखमी झाल्यात.ही माहिती मौजा माहेर गावातील आप्तपरिवारांना मिळताच त्या गावात शोककळा पसरली.

         याचबरोबर चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक,चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष,काँग्रेस पक्ष ओबीसी सेलचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉ.सतिश वारजूकर यांना अपघाताची माहिती होताच त्यांनी घटनास्थळाकडे तात्काळ मार्गक्रमण करीत सर्व परिस्थिती प्रत्यक्ष बघितली.

       यानंतर प्राथमिक उपचार शिर्सी आरोग्य केंद्रात केल्यानंतर सर्व अपघातग्रस्त महिलांना पुढील उपचारासाठी नागपूर शासकीय मेडिकल कॉलेजला हलविण्यात आले.यात डॉ.सतिश वारजूकरांनी सर्व आवश्यक मदत केली व जातीने अपघातग्रस्त महिलांच्या उपचाराकडे लक्ष ठेवून आहेत.

           टाटा सुमो गाडी पलटी झाल्याने वाहनातील १४ महिला मजूर गंभीर जखमी झाल्या तर ३ महिला जागीच मृत पावल्या. जखमीं महिलांना तातडीने सिर्सी येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार दिल्यानंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय मेडिकल कॉलेज येथे पाठवण्यात आले.समुद्रपूर तालुक्यातील सिर्सी उमरेड रोडवर सिर्सी इथून जवळपास ३ किमी अंतरावर हा अपघात झाला.

        ब्रम्हपुरी तालुक्यातील माहेर [खरबी ] गावातून एकूण १७ महिला चार चाकी सुमो गाडीने सिर्सी जवळील पिपरी येथे चना कापण्यासाठी गेले होते.

व स्व.गावी परत जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. याची माहिती राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांना मिळताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व जखमी महिलांना प्राथमिक उपचारासाठी सिर्सी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठवण्यात आले. 

          मजूर महिला गंभीरित्या जखमी असल्याने पुढील उपचारासाठी शासकीय मेडिकल कॉलेज नागपूर येथे पाठवण्यात आले व स्वतः डॉ.सतिशभाऊ वारजुकर यांनी शासकीय मेडिकल कॉलेज नागपूर येथे जाऊन जखमी महिलांवर उपचार सुरू करण्याची व्यवस्था करून दिली आहे.

         घटना स्थळावर मृत्यू झालेल्या मजूर महिलांचा अंतिम संस्कार मौजा माहेर (खरबी) येथील स्मशानभूमीत आज होणार असून साश्रुनयनांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.

       मृतक महिलेचे कुटुंबिय, आप्तपरिवार सदस्य,गावातील नागरिक,शोकाकुल आहेत.