बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत दगडवाडी येथे नंदिकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंभू महादेव विद्यालयामध्ये हर्ष-उल्हास वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा आज शुक्रवारी (दि.9) सायंकाळी 7 वा. संपन्न होत आहे.
या हर्ष-उल्हास वार्षिक स्नेह स्नेहसंमेलन सोहळ्याचे उद्घाटन हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते यावेळी होणार आहे. या कार्यक्रमास निरा भिमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या हर्ष-उल्हास स्नेहसंमेलन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष वसंत (आबा) मोहोळकर, उपाध्यक्ष राहुल जाधव, स्कूल कमिटीचे चेअरमन रामदासनाना रासकर यांनी केले आहे.